अल्लाहू अकबरच्या घोषणा देत गणेश मंडळावर धर्मांधांची दगडफेक

    12-Sep-2024
Total Views |

Stone Pelting Ganesh Murti
 
लखनऊ (Stone Pelting Ganesh Murti) : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील गणेश मंडळावर अल्पवयीन कट्टरपंथींना मध्यस्ती करत गणेश मंडळांवर दगडफेक करण्यास सांगितले गेले. ही घटना १० सप्टेंबर रोजी घडली असून यावेळी काहींनी देवाच्या मूर्तीसमोरील कलश तोडल्याचे कृत्य केले. यावेळी कट्टरपंथींनी अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या होत्या. यावेळी हिंदूंनी घडलेल्या घटनेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास सुरू आहे.
 
लखनऊ येथील गंगा विहार येथे पानपट्टीचा व्यवसाय करणारा विवेक चौरसिया यांच्या घरात गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. सकाळी आणि सायंकाळी गणेशाच्या मूर्तीची पूजा होताना हा घृणास्पद प्रकार घडला.  मात्र १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विवेक चौरसिया बाहेर गेले असता काही २०-२५ अल्पसंख्यांक कट्टरपंथी युवकांनी गणेश मूर्तींवर दगडफेक केली. यावेळी घटनास्थळी विवेक चोरसियाचे कुटुंब होते. या दगडफेकीत मूर्तीच्या समोर असलेल्या कलशावर हल्ला झाला आणि तो फुटला.
 
 
 
त्यानंतर विवेकच्या पत्नीने याकृत्याविरोधात प्रतिकार केला. यावेळी त्यांनी विवेकच्या पत्नीला शिवीगाळ केली. यावेळी अनेकजण घटनास्थळी पोहोचले होते. काही व्यापाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत चिनहट पोलीस ठाणे येथे कट्टरपंथींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन कट्टरपंथी संशयितांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिकारी शशांक सिंह यांनी सांगितले की या गुन्हाचा पुढील तपास सुरू असून लवकरात लवकर कारवाई केली जाईल.