नौदलाच्या दोन पाणबुडीविरोधी जहाजांचे जलावतरण

    10-Sep-2024
Total Views |

cochin
 
नवी दिल्ली, दि. १० : विशेष प्रतिनिधी : भारतीय नौदलाच्या ‘माल्पे’ आणि ‘मुल्की’ या दोन पाणबुडीविरोधी जहाजांचे कोची येथे जलावतरण करण्यात आले आहे.
 
मेसर्स कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे भारतीय नौदलासाठी बांधण्यात येणाऱ्या आठ पाणबुडीविरोधी वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकल्पातील चौथे आणि पाचवे जहाज ‘मालपे आणि मुल्की’ यांचे सोमवारी सीएसएल कोची येथे जलावतरण करण्यात आले. सागरी परंपरेनुसार दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हॉइस ऍडमिरल व्ही. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत विजया श्रीनिवास यांच्या हस्ते दोन्ही जहाजांचे जलावतरण करण्यात आले.
 
माहे या श्रेणी - एएसडब्ल्यु शॅलो वॉटर क्राफ्ट्सला भारताच्या किनारपट्टीवरील रणनितीक दृष्ट्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या बंदरांचे नाव देण्यात आले आहे आणि हे जहाज आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत पूर्वीच्या युद्धनौकांचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. ३० एप्रिल २०१९ रोजी संरक्षण मंत्रालय आणि सीएसएल यांच्यात आठ एएसडब्ल्यु एसडब्ल्युसी जहाजे बांधण्याचा करार झाला होता.
 
माहे श्रेणीतील जहाजे स्वदेशी विकसित, अत्याधुनिक अंडरवॉटर सेन्सर्सने सुसज्ज असतील आणि किनारपट्टी लगतच्या भागात पाणबुडीविरोधी मोहीम तसेच कमी तीव्रतेच्या सागरी मोहीमा आणि माइन लेइंग कार्य करण्यासाठी यांची परिकल्पना करण्यात आली आहे. एएसडब्ल्यु एसडब्ल्युसी जहाजे १०० टन भारासह २५ नॉट्सचा कमाल वेग मिळवू शकतात. या जहाजांचे एकाचवेळी जलावतरण ‘आत्मनिर्भर भारत’ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वदेशी जहाजबांधणी क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकते. एएसडब्ल्यु एसडब्ल्युसी जहाजांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आहे. त्यावरून हे सुनिश्चित होते की भारतीय उत्पादन युनिट्सद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन कार्यान्वित होत आहे, ज्याद्वारे देशात रोजगार निर्मिती वाढेल.