"मी बांगलादेशातील सनातनी आहे हे पाप आहे का? " बांगलादेशी हिंदू युवतीने मांडली व्यथा
09-Aug-2024
Total Views |
ढाका : बांगलादेशात हिंदूं महिलांवरील (Bangladeshi Hindu Women) हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. कट्टरपंथीयांनी गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशी हिंदूवर हल्ला केला आहे. हिंदूंच्या मंदिरावरही दगडफेक केली आहे. हिंदूंची घरे लुटण्यात आले आहे. अपहरण करण्यात आले आहे. याबाबत बांगलादेशी हिंदू महिलांनी याप्रकरणी धक्कादायक दावे केले आहेत. होते नव्हते सर्व लुटले आणि माझ्या १४ वर्षांच्या मुलाचे अपहऱण केल्याचा धक्कादयक दावा बांगलादेशी हिंदू महिलेने केला आहे. तसेच एका हिंदू युवतीने मी बांगलादेशील सनातनी असणं पाप आहे का? असा सवाल केला आहे.
व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदू या सोशल मीडियासाईटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्या व्हिडिओत हिंदू पीडित महिलेने टाहो फोडत घडलेला प्रकार सांगितला, “ते आले त्यांनी आमचे घर लुटले. आमचे पैसे, सोने आणि जे काही मौल्यवान राहिले ते त्यांनी काढून घेतले. माझ्या १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. तसेच आमच्या घराची तोडफोड केली आम्हाला मारहाण केली, असे म्हणत पीडित हिंदू महिलेने अश्रू ढाळले आहेत.
तसेच एका व्यक्तीने सांगितले की, काही १०-१२ जमावाने माझ्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर एकाने कोऱ्या स्टँम्प पेपरवर सही करायला सांगितली. अपहरण केलेला मुलगा पुन्हा हवा असेल तर तब्बल १० लाख रूपये द्यावे लागतील अशी पीडित महिलेकडे अट ठेवण्यात आली होती.
तसेच एका बांगलादेशी हिंदू महिलेने फेसबुक लाईव्ह करत घडलेला प्रकार सांगितला. कट्टरपंथींनी घरातील तीन लाख रूपये लुटले. तसेच माझ्या भावावर चाकूने हल्ला केला. मी बांगलादेशातील सनातनी आहे हे पाप आहे का? अनेक हिंदू घरांना लक्ष केले गेले आहे.
जर आज आपण आमच्यावर हल्ले करत आहात तर उद्याही काही लोकं तुमच्यावर हल्ले करतील. जर आपण आपल्या पाठीशी उभे राहिलो नाहीतर आपण उद्या टिकू शकणार नाही, असे पीडित युवतीने आपली व्यथा व्यक्त केली. दरम्यान, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर ७ ऑगस्टपासून ते आजपर्यंत बांगलादेशी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनात तब्बल २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ५५० वर मृतांचा आकडा गेला आहे.