दीड हजार जणांचा शेख हसीनांच्या घरावर हल्लाबोल! अंतर्वस्त्र घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल
06-Aug-2024
Total Views | 65
ढाका (Bangladesh Attack) : बांगलादेशचे असंख्य विद्यार्थी आंदोलक ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरात घुसले. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बांगलादेशी युवकांनी पंतप्रधानांच्या घरात घुसून पंख्यापासून साड्यांपर्यंत वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तसेच अंतर्वस्त्र घेऊन काही तरूण रस्त्यावर, कॅमेऱ्यासमोर फिरताना दिसत आहेत. बांगलादेशी युवक हे लोकशाहीसाठी लढले असल्याचे भासवण्यात येत आहे. मात्र, या जमावाला महिलांबाबत आदर नाही. म्हणूनच त्यांनी अंतर्वस्त्र कॅमेऱ्यासमोर फिरवले, अशी टीका केली जात आहे.
सध्या शेख हसीना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी ४ हिंडन विमानतळावर त्यांचे विमान उतरले. बांगलादेशात गेल्या १५ वर्षांपासून त्य़ा सत्तेत होत्या. त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. आंदोलनातील एक व्यक्ती माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्या 'गणभवन' निवासस्थानी जाऊन साडी घालून बाहेर पडताना दिसला. त्याने महिलांचे कपडे बदलीत ठेवले होते. महिलांच्या कपड्यांसह मासे तसेच कचऱ्याचा डब्बा त्याने उचलून आणला होता.
तसेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्या निवासस्थानाची आंदोलकांनी दयनीय अवस्था करून ठेवली होती. युवकांनी निवासस्थानाचे फर्निचर पेटवले. ब्लँकेंट, व्यायमशाळेची उपकरणे आणि महागडे सुटकेस लुटण्यात आले. पाळीव प्राण्यांचेही हाल केले. दरम्यान, स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार गणभवनात दीड हजार लोकांनी शिरकाव केला होता. आता हसीना शेख यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये लष्करांचे सरकार येण्याची शक्यता आहे. लष्करांनी ५ ऑगस्ट रोजी हसीना यांच्या राजीनाम्यानंतर सरकार बनवण्यासाठी इतर पक्षांसोबत बैठक घेऊन याबाबतीत निर्णय घेतला आहे.