धर्मांतरणाला युवतीचा नकार, कट्टरपंथी युवकाने अॅसिड हल्ल्याची दिली धमकी
05-Aug-2024
Total Views | 35
लखनऊ (conversion in islam) : उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे दि: २९ जुलै रोजी कट्टरपंथी युवकाने युवतीला धर्मांतरणासाठी (conversion in islam) जबरदस्ती केली. जर इस्लाम धर्म स्विकारला नाहीतर अॅसिड हल्ला करेल, अशी धमकी कट्टरपंथी युवक मोहम्मद वसीफ अन्सारीने दिली. यामुळे पीडित युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कुरवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
आरोपी वसीफकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून युवतीने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. शनिवारी, ३ ऑगस्ट रोजी मृत पीडितेच्या वडिलांनी याबाबत मैनपुरी पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. आरोपी युवक वासीफ अन्सारी हा पीडित युवतीवर इस्लाम धर्म स्विकारण्याबाबत (conversion in islam) दबाव टाकत होता. वसीफने पीडितेला तिचा अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. धर्मांतरण केलं नाहीतर वसीफने अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली. पीडितेच्या वडिलांनी आपली मुलगी ही B.sc करत असल्याचं सांगितले होते.
याविरोधात आता मृत पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, "घरनाजपूर परिसरातील रहिवासी वसीफ अन्सारी आपल्या मुलीला इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. तो घरी यायचा आणि पीडित युवतीने मागण्या मान्य केल्या नाहीतर तो अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करील अशा धमक्या द्यायचा", असं पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
वसीफच्या कृत्याबाबत पीडितेने कुटुंबाल सांगितले होते. मात्र,आपल्या मुलीची बदनामी होईल या भीतीने त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे टाळले. याउलट पीडितेच्या वडिलांनी वसीमचे वडील अस्लम आणि भाऊ सलीमकडे तक्रार केली. मात्र, त्यांनीही पीडितेच्या वडिलांना तिथून हकलवलं.
याप्रकरणात आता एसपी विनोद कुमार यांनी दखल घेत घटनेची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "कुरवली येथे मुलीने तिच्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी मयत पीडितेच्या वडिलांनी आरोप केला. त्याच वस्तीत राहणाऱ्या वसीफ अन्सारीने पीडितेचा छळ केला आणि लग्नासाठी दबाव आणला गेला. यामुळे युवतीने आत्महत्या केली", असल्याचं एसपी विनोदकुमार म्हणाले.