उरण हत्या प्रकरण : दाऊद शेखने केली यशश्री शिंदेंची हत्या!

    02-Aug-2024   
Total Views |
 
Yashashri Shinde & Dawood Sheikh
 
एक तरुणी आपल्या रोजच्या दिनक्रमानुसार सकाळी घरून कामावर निघाली. मात्र, त्यादिवशी ती तर परत आलीच नाही. त्यामुळे कुटुबियांनी शोधाशोध सुरु केली. दुर्दैवाने दोन दिवसांनी अचानक तिचा मृतदेहच सापडला. ही गोष्ट आहे उरणमधील यशश्री शिंदे नामक तरुणीची. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. तर कृर आरोपीने यशश्रीच्या शरीरावर एवढे वार केलेत की, मृतदेह बघितल्यानंतर तिच्या कुटुंबियांच्या अंगावर अक्षरश: काटाच उभा राहिला. ही हत्या नेमकी कशी झाली? या हत्येमागे कारण काय? आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
 
यशश्री शिंदे ही २२ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबाबरोबर उरण शहरात राहत होती. ती बेलापूरमध्ये एका कंपनीत कामाला होती. रोजच्याप्रमाणे दिनांक २५ जुलै रोजी ती कामावर जाण्यासाठी सकाळी घराबाहेर पडली. परंतू, त्या दिवशी ती परतलीच नाही. शिवाय तिचा फोनही बंद येत होता. त्यामुळं यशश्रीच्या पालकांनी तिचा शोध सुरु केला. मात्र, तिचा तपास लागत नसल्यानं त्यांनी उरण पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी यशश्रीचा तपास सुरु केला. दिनांक २७ जुलै रोजी रेल्वे स्थानकाजवळीत झाडीत एक मृतदेह आढळला. विशेष म्हणजे हा मृतदेह इतक्या छिन्नविछिन्न अवस्थेत होता की, त्याची ओळख पटवणंही कठीण झालं होतं.
 
त्यानंतर पोलिसांना हा मृतदेह यशश्रीचा असल्याची शंका आल्यानं त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यशश्रीच्या आईवडीलांना बोलवलं. तिच्या आईवडिलांना कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटली आणि त्यांना जोरदार धक्का बसला. आरोपीने यशश्रीच्या संपूर्ण शरीरावर चाकूने वार केले होते. तिच्या छातीवर आणि गुप्तांगावर जखमा होत्या. शिवाय तिचा चेहरा पुर्णपणे चेंदामेंदा करण्यात आला होता.
 
या संपूर्ण घटनेनंतर यशश्रीच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर संशय घेत त्यानेच हा हल्ला केल्याचं म्हटलंय. आता हा दाऊद शेख नेमका कोण? तर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये यशश्रीने दाऊद आपल्याला त्रास देतो, अशी तक्रार तिच्या वडिलांकडे केली होती. त्यानंतर यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेखविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दाऊदवर गुन्हा दाखल करत त्याला पॉक्सोअंतर्गत अटकही केली होती. त्यानंतर त्याची सुटका झाली. मात्र, याच अटकेचा राग डोक्यात ठेवून आता बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जातंय.
 
पोलिसांनी यशश्रीचा फोन तपासला असता ती एका नंबरवर सातत्याने कॉल करत असल्याचं त्यांना आढळलं. हा नंबर दुसऱ्या कुणाच्या नाही तर दाऊदचाच असल्याची माहितीही पुढे आलीये. मृत्यूपूर्वी या नंबरवरून अनेकदा यशश्री आणि दाऊदचं बोलणं झाल्याचंही कळतंय. त्यामुळे दाऊदने कर्नाटकमधून परत येत यशश्रीशी संपर्क साधला आणि तिला जाळ्यात ओढत तिची निर्घृण हत्या केल्याचा संयश व्यक्त करण्यात येतोय. दाऊद शेख सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये पोलिसांची पथकं त्याचा शोध घेताहेत. एक माहिती अशीही आहे की, यशश्रीने दाऊदच्या नावाचा टॅटू बनवला होता. त्यामुळे या दोघांमध्ये खरंच प्रेम होतं का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडे, यशश्रीच्या आईवडीलांनी या प्रेमप्रकरणाच्या बातम्या फेटाळल्या आहेत. "आमची मुलगी तशी नव्हती. २०१९ मध्ये आमच्या मुलीवर दबाव टाकून तिचा विनयभंग करण्यात आलाय. याला तुम्ही प्रेमप्रकरणाचं नाव देत असाल तर ते चुकीचं आहे," असं त्यांनी म्हटलंय.
 
त्यामुळे यशश्री ‘लव्ह जिहाद’ला बळी पडली असून, तिच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया उरण परिसरातून उमटतीये. या हत्येचा निषेध म्हणून उरण बाजारपेठ बंद करत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. आरोपी दाऊद शेखला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येतीये. तर दुसरीकडे, यशश्रीच्या नातेवाईकांनी आरोपी दाऊदला आमच्या हातात सोपवून त्याचे तुकडे करण्याची मागणी केलीये.
 
या संपूर्ण घटनेमुळे २०२२ मधील श्रद्धा वालकर प्रकरण पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आलंय. पण सध्या प्रश्न हा आहे की, प्रेमाच्या नावाखाली अशा किती निरपराध श्रद्धा आणि यशश्रीला विनाकारण आपला जीव गमवावा लागेल.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....