‘स्त्री २’चं ग्रँड ओपनिंग! ‘कल्की’लाही बॉक्स ऑफिसवर टाकलं मागे

    16-Aug-2024
Total Views |

stree 2 
 
 
 
मुंबई : अमर कौशिक दिग्दर्शित बहुचर्चित स्त्री २ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापुर्वी देखील तिकीट बूकिंगच्या बाबतीत इतिहास रचला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘स्त्री’ २०१८ मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी ‘स्त्री २’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आला आहे.
 
‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली असून चित्रपटाने कल्की चित्रपटालाही मागे टाकलं आहे ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, स्त्री हा चित्रपटाने पहिल्या दिवशी ४९.७५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.३९ कोटी. आणि १४ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या शो मधून ८.३५ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ६१.४९ कोटींची कमाई केली आहे. 
 
 
 
‘स्त्री २’ने ‘कल्की 2898 एडी’ (हिंदी- २४ कोटी) आणि ‘फायटर’ला (२२ कोटी) मागे टाकलं असून हा चित्रपट २०२४ मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दरम्यान, २०२३ मधील शाहरुख खानच्या ‘जवान’ (६५.५ कोटी) आणि ‘पठाण’ (५५ कोटी) नंतर ‘स्त्री २’ हा आतापर्यंतचा पहिल्या दिवशी उत्तम ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.