नवी दिल्ली : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे जाहिर करण्यात आली. यात ‘वाळवी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने २ राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.
रिषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असून सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रिषभ शेट्टी यांची निवड झाली आहे. तसेच, ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर नावे कोरणाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट समीक्षक - दीपक दुआ
सर्वोत्कृष्ट नॉन फिचर चित्रपट - आत्तम (मल्याळम चित्रपट)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- सुरज बडजात्या (चित्रपट - उंचाई)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिषभ शेट्टी (कांतारा चित्रपट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - नीना गुप्ता (उंचाई चित्रपट)
सर्वोत्कृष्ट गायक - अरिजित सिंग ( ब्रम्हास्त्र चित्रपट)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - के.जी.एफ २
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी
स्पेशन मेंशन पुरस्कार - मनोज वाजपेयी (गुलमोहर चित्रपट)