मुंबई : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तसेच, सचिन सुर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वारसा' या चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
१९५४ सालापासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचा पहिला मान 'श्यामची आई' या चित्रपटाला १९५४ साली देण्यात आला होता. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानंतर राष्ट्रपती या पुरस्कारांचे वितरण करतात.