देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट : पंतप्रधान मोदी
15-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : देशाच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत २०४७' या संकल्पपूर्तीसाठी नवनवीन योजना राबविण्यावर भर दिला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पीएलआय योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीला प्रोत्साहन सरकारकडून देण्यात येत आहे. दरम्यान, भारत जागतिक उत्पादनाचे केंद्र बनेल, याकरिता सरकार पावले उचलत आहे, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हणाले.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तो दिवस दूर नाही जेव्हा भारत औद्योगिक उत्पादनाचे केंद्र असेल आणि संपूर्ण जग भारताकडे बघेल, असा विश्वास व्यक्त केला. देशाला एक मोठे उत्पादन केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तर चालना मिळेल. जगाच्या अनेक क्षेत्रात अग्रेसर होऊन देश आपल्या मोठ्या संसाधनांचा आणि कुशल कामगारांचा वापर करून उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनू शकतो, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, उद्योगांना आयातीवरील अवलंबित्व कमी करून 'मेक इन इंडिया'वर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, 'मेक इन इंडिया'चे आवाहन करताना सरकारच्या १.९७ लाख कोटी रुपयांच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेबद्दलही ते यावेळी म्हणाले, पीएलआय योजना अत्यंत यशस्वी झाली असून देशाला उत्पादनाचे मोठे केंद्र बनवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.