बलात्कार-हत्या झालेल्या निर्भयासाठी न्याय मागणाऱ्या डॉक्टरांवर तृणमुल काँग्रेसच्या गुंडांचा हल्ला!

    15-Aug-2024
Total Views |

Kolkata Abhaya Case

कोलकाता : पश्चिम बंगाल येथील आरजी कर वैद्यकिय (RG Kar hospital) शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयाला ५० जणांच्या जमावाने वेढा घातला. प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनीवर झालेल्या बलात्काराविरोधात आरजी कर या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संस्थेत न्याय मागणाऱ्या डॉक्टरांवर गुंडांनी हल्ले केले आहेत. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेने देश हादरला आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणात तृणमूल पक्षाच्या ममता बॅनर्जी यांचे गुंड असल्याचे आढळले आहे.
 
संबंधित घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून व्हिडिओत हल्लेखोरांनी रूग्णालयाच्या आवारात नासधुस केली आहे. न्याय मिळवणाऱ्या डॉक्टरांवरही हल्ले केले असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यावेळी वाहनांची तोडफोड केली आहे. बलात्काराच्या घडलेल्या घटनेवरून डॉक्टरांनी निदर्शने केली होती. मात्र गुडांनी हल्ले करत न्याय मागणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले केले आहेत.
 
 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचा जमाव हा रूग्णालयाच्या बाहेर उभा होता. त्यानंतर ते अचानकपणे रूग्णालयाच्या आवारात घुसले आणि त्यांनी तोडफोड करायला सुरूवात केली. इमर्जन्सी वॉर्ड फोडून फर्निचर व औषधांचा साठा फोडला. एकत्र आलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, तसे अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी पोलिसांचे हाल झाले होते. रूग्णालयाचे संरक्षण करणारे पोलीस जखमी झाले होते. त्यांच्यावर मातीच्या विटांनी हल्ला करण्यात आला होता. 
 
 
 
याप्रकरणी वरिष्ठ डॉक्टर मलिक यांनी माहिती दिली की, हल्लेखोरांचा जमाव हा रूग्णालयात घुसला होता. त्यानंतर आंदोलकांवर केलेल्या हल्ल्याने आंदोलक डॉक्टर तिथून पळून गेले होते. त्यावेळी त्यांनी एका ज्युनिय़र डॉक्टरवर हल्ला करून बलात्कार केला. मात्र ही घटना पाहता पोलीस मूग गिळून गप्प बसले होते.
 
याप्रकरणी अनिकेत मैती नावाच्या डॉक्टरांनी सांगितले की, हल्लेखोर बाहेर होते. त्यांनी रूग्णालयाच्या आवारात येऊन हल्ले केले. हे सर्व पोलिसांनी पाहिले मात्र पोलिसांनी काहीही केले नाही. कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी जमावाने विनाकारण मारहाण केल्याचा दावा केला आहे.
 
 
 
पोलीस आयुक्तांनी संशयीताला लवकरात लवकर अटक केली जावी अशी मागणी होती, कोणाचीही गय केली जाऊ नये असे पोलिसांनी सांगितले. आम्ही मुख्य संशयिताला तातडीने अटक केली. यावर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप संबंधितांनी केला होता.
 
 
 
याचपार्श्वभूमीवर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी सत्ताधारी तृणमुल काँग्रेसने हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला होता. अशातच त्यांनी ट्विट केले. ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेसच्या गुडांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथील निषेध रॅलीत पाठवले होते. त्यांना वाटले की आंदोलक वाटणारे गुंड हे रूग्णालयात घुसखोरी करतील आणि रूग्णालयावर हल्ला करतील, असा तर्क लावण्यात आला, मात्र त्याचा फायदा झाला नाही.