बारामतीत यंदा युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार सामना रंगणार?

    15-Aug-2024
Total Views |
 
Pawar
 
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाकडून विधानसभेची तयारी सुरु केल्याची माहिती पुढे आली होती. तर दुसरीकडे, अजित पवारांनी गुरुवारी आपला मुलगा जय पवार यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं. त्यामुळे बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा सामना रंगणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
 
लोकसभा निवडणूकीमध्ये बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होता. यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यानंतर आता विधानसभेतही पवार घराण्यातील दोन उमेदवार उभे राहणार असल्याचे संकेत आहेत. शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी भेटीगाठी सुरु केल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे, अजित पवारांनी त्यांचे पुत्र जय पवार यांच्या उमेदवारीवर आज भाष्य केलं.
 
हे वाचलंत का? -  लाडकी बहिण योजना! आतापर्यंत 'इतक्या' लाख बहिणींच्या खातात ३ हजार रुपये जमा
 
अजित पवार म्हणाले की, "मी बारामतीतून ७-८ निवडणूका लढवल्या आहेत. मला बारामतीतून लढण्यात फार रस नाही. त्यामुळे जनतेचा तसा कल असल्यास जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंट्री बोर्डमध्ये निर्णय होईल. पार्लमेंट्री बोर्ड आणि त्या भागातील कार्यकर्ते जी मागणी करतील तेच होईल," असे ते म्हणाले. त्यामुळे आता बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.