जुलै महिन्यात म्युच्युअल फंडांनी केली 'या' कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी
14-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : म्युच्युअल फंडांनी निफ्टी ५० समभागांमध्ये सर्वाधिक खरेदी केली आहे. जुलै २०२४मध्ये म्युच्युअल फंडांनी एशियन पेंट्स, अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी केली आहे. दरम्यान, मोतीलाल ओसवाल यांच्या डेटा विश्लेषणातून ही माहिती मिळाली आहे.
दरम्यान, म्युच्युअल फंडांनी या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे गुंतवणूकदारांचा या कंपन्यांवर विश्वास असल्याचे दिसून येत आहे. गुंतवणूकदारांनी निफ्टी मिडकॅप १०० मध्ये तब्बल ५९ टक्के शेअर्स देखील खरेदी केले आहेत. यापैकी जुलै महिन्यात सर्वाधिक खरेदी पतंजली फूड्स, मजॅगॉन डॉक, येस बँक, गोदरेज प्रॉपर्टीज आणि पिरामल एंटरप्रायजेसमध्ये करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ मध्ये म्युच्युअल फंडांनी निफ्टी स्मॉलकॅप १०० मधील सुमारे ५७ टक्के कंपन्यांच्या समभागांची खरेदी केली. यामध्ये पीएनबी हाउसिंग फायनान्स, हिमाद्री स्पेशॅलिटी, जीएनएफसी, मणप्पुरम फायनान्स आणि इंटेलेक्ट डिझाइनमध्ये सर्वाधिक खरेदी करण्यात आली आहे.
सर्वाधिक नफा असलेल्या टॉप २५ योजनांमध्ये, ICICI प्रू व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड (७ टक्के), एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड (६.२ टक्के), निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (६.१टक्के), SBI लाँग टर्म इक्विटी फंड (अप) निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड (५.७ टक्के) आणि निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड (५.५ टक्के) यात सर्वाधिक वाढ झाले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक लक्षणीय वाढली असून क्षेत्रातील गुंतवणुकीत सलग दुसऱ्या महिन्यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.