जन्नत, अल्लाह आणि ईद...? नर्मदा शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेला मुस्लीम धर्मातील प्रश्न!
14-Aug-2024
Total Views |
गांधीनगर : गुजरातच्या भरूच येथील नर्मदा शाळेत चाचणी परिक्षा पार पडली. त्या चाचणी परिक्षेत मुस्लिम समाजाबाबत काही प्रश्न विचारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ईद दिवशी नमाज पडले जाते त्याचे नाव काय? असा सवाल करण्यात आला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही शाळा भारतातील आहे की पाकिस्तानातील असा सवाल उपस्थित झाला. याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मुस्लिम धर्माबाबतचे काही प्रश्न हे चाचणीला धरूनच छापण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चाचणी परिक्षा ही ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. चाचणी परिक्षा असलेला प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये पाच योग्य पर्याय निवडण्याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील चार प्रश्न हे मुस्लिम धर्माशी संबंधित आहेत.
प्रश्नपत्रिकेतील पहिल्या प्रश्नात विचारण्यात आले की, आपण या जगात कोणामुळे आलो आहोत? त्याला पर्याय म्हणून आई, वडील, परिवार आणि खुदा असे पर्याय देण्यात आले होते. तसेच दुसऱ्या प्रश्नात विचारण्यात आले होते की, 'अल्लाहची इच्छा असेल तर प्रत्येकजण पळून जाऊ शकतो. याला किस्मत, मन्नत, दावत आणि आफत असे शब्द पर्याय दिलेले आहेत. तिसऱ्या प्रश्नात रजमानचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात रजमानच्या तीस दिवसानंतर... येते? त्याला पर्याय म्हणून विघन, दान आणि फेरे आणि रोजा असे पर्याय देण्यात आले आहेत. तसेच चौथ्या प्रश्नात विचारण्यात आले की, ईद दिवशी नमाज पडले जाते त्याचे नाव काय आहे? याला इदबाग, इदमेदान, इदघर आणि ईदगाह असे पर्याय देण्यात आला आहे.
सांगण्यात आले आहे की, जेव्हा काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिका घरी जाऊन दाखवल्या, त्यावेळी त्यांनी याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. एका विशिष्ट समाजाबाबतचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले गेल्याने त्याचा विरोध करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित शाळेने याबाबत मोठे भाष्य केले आहे. पाठ्यक्रमानुसारच हे प्रश्न विचारण्यात आले आहेत असा दावा करण्यात आला होता.
शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, विचारण्यात आलेले प्रश्न हे पाठ्यपुस्तकातील आहेत. कोणताही एक प्रश्न पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणावर वादंग निर्माण झाल्याचे कारण म्हणजे हे प्रश्न एकामागोमाग होते. मात्र यामागे कोणत्याच शिक्षकाचा हात नव्हता. सांगण्यात आले की, हे प्रश्न पाठ्यापुस्तकाद्वारे विचारण्यात आले आहेत.