मॅनहोल : मुंबईतील मृत्यूचे सापळे...

    13-Aug-2024   
Total Views |
mumbai city roads manholes


मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे एका ३५ वर्षीय मजुराचा मॅनहोलमध्ये पडून नुकताच मृत्यू झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील मृत्यूचे सापळे ठरलेल्या जीवघेण्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई महानगरपालिकेने मॅनहोलच्या झाकणांची चोरी टाळण्यासाठी स्मार्ट सेन्सर योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील असुरक्षित मॅनमोल आणि त्यासंदर्भात पालिकेने घ्यावयाची खबरदारी याचा उहापोह करणारा हा लेख...

मुंबई महानगरपालिका नागरिकांना २५ पेक्षा जास्त सेवा पुरविते. पण, त्यांचे मलजल वाहिनी आणि मलजल प्रक्रिया केंद्रे बांधण्याच्या कामांमध्ये मात्र अती विलंब होताना दिसतो.

मुंबई महानगरपालिकेच्या मलजल विभागाने मॅनहोलची झाकणे चोरीला जात आहेत, हे कळल्यावर त्यासंबंधीची कामे म्हणजे स्मार्ट मॅनहोल झाकणे लावणे (ीारीीं ारप-हेश्रश र्लेींशीी) बसविण्याचा प्रकल्प हातात घेतला. खरे म्हणजे, ही मॅनहोलवरील झाकणे मलजल वाहिनींवर, पर्जन्य जलवाहिनींवर आणि शुद्ध जलवाहिनींच्या व्हॉल्व्ह बसविण्याच्या जागी खोली करून जमिनीसपाट ट्रफिकला अडथळा होऊ नये म्हणून बांधायला लागतात. व्हॉल्व्ह हे जलवितरणाकरिता वापरावे लागतात, तर इतर वाहिनींवरची जलभांडी ही गाळ काढून स्वच्छता ठेवण्याकरिता वा जोडकाम करण्याकरिता वापरायला मिळतात.

२०१९ पासून कोरोना काळात मुंबईतील टोळीचोरांनी या मॅनहोलवरील झाकणे चोरी करून ती पळवून नेण्याची व ती बाजारामध्ये विकून पैसे कमावण्याची अजब पद्धत अंगीकारली आहे. ‘कोविड’ काळानंतर या चोरी केलेल्या झाकणांचे नुकसान होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०२३ मध्ये तर दिवसाला अशी दोन झाकणे चोरीला जात होती. परंतु, पावसाळ्यात हे मॅनहोल पुराच्या पाण्याखाली गेल्याने दृष्टीआड बनतात व लहान मुले, म्हातारेकोतारे वा कोणीही या मॅनहोलमध्ये नकळत पडून जीव जाण्याइतपत अपघात होऊ शकतात. गेल्या काही वर्षांत अनेकजण या मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडले आहेत. २०१७ मध्ये डॉ. दीपक अमरापूरकर हे परळच्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये मालाडलाही अशीच घटना घडली होती आणि अशाच अन्य घटनाही अलीकडच्या काळात मुंबईत घडल्या आहेत. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने अशा मॅनहोलवर झाकणे व जाळ्या बसवून त्यांची तोंडे व्यवस्थित व सुरक्षितरित्या बंद करण्यास प्रारंभ केला आहे.

मॅनहोलंच्या झाकणांची चोरी किती? मॅनहोलच्या झाकणाची संख्या किती ?
सन किती झाकणांची चोरी सर्व मॅनहोलची झाकणे १.४ लाख अंदाजे
२०१९ ३९६ पर्जन्य जलवाहिनींवरील मॅनहोलची झाकणे २५,००० अंदाजे
२०२० ४५८ मलजलवाहिनींवरील मॅनहोलची झाकणे ७५,००० अंदाजे
२०२१ ५६४ शुद्ध जलवाहिनींवरील व्हॉल्व्ह भांड्यांवरील झाकणे ४०,००० अंदाजे
२०२२ ८३६
२०२३ ७९१
२०२४ (जूनपर्यंत) २२०
झाकणांचे प्रकार धातूंची वा इतर (कास्ट आयर्न, डकटाईल आयर्न, एफआरपी)
त्यांचे आकार, मापे, वजन व किंमत : -१. वर्तुळाकार व्यास ४८० ते ५३० मिमी, ; वजन ७० ते ८० किग्रॅ; किंमत अंदाजे रु ८०००;

२. आयताकृती ३ ु २ फूट वा ३ ु १.५ फूट किंमत रु १०००० ते १५०००; ३. मिश्र आकार ४ ु ३ फूट ; वजन ९० ते १०० किग्रॅ ; किंमत रु ३५००० अंदाजे
२०२३ मधील चोरीची जास्ती चोरीची मुंबईतील ठिकाणे -

१. के पश्चिम (अंधेरी, जुहू)- ९७ झाकणे,
२. जी दक्षिण (लोअर परळ, वरळी); - ७७ झाकणे,
३. आर मध्य (बोरिवली) - ६७ झाकणे,
४. आर उत्तर (दहिसर)- ४६ झाकणे


चोरी कोण करतात?

कास्ट आयर्नच्या झाकणांची चोरी रात्रीच्या वेळी कोणी बघत नाही म्हणून हे भुरटे चोर करतात. जुन्या बाजारात जाऊन ती झाकणे रिसेलच्या भावाने विकतात व १००० ते १२०० रुपये प्रत्येक झाकणामागे कमावतात. कास्ट आयर्नचा रिसेलचा भाव किलोला रु. २० ते ३० पर्यंत असू शकतो. अशाप्रकारच्या चोर्‍या या महापालिकेसाठी एकप्रकारे ओझेच बनते. महापालिकेने यावर विचार करून अनेक क्लुप्त्या काढल्या, पण अजून त्या कल्पनांना यश मिळालेले नाही. ‘कास्ट आयर्न’ झाकणाऐवजी ‘एफआरपी’ची झाकणे विचारात घेतली. कारण, त्यांना रिसेल किंमत नगण्य आहे, पण भुरटे चोर काही कमी नाहीत. ते पण रागावून ‘एफआरपी’ झाकणांचे तुकडे करून मोकळे होतात. तेथे जे लोखंडी सामान आहे, त्याची चोरी करतात. ‘कास्ट आयर्न’च्या जागी ‘डक्टाईल आयर्न’ची झाकणे वापरली, जी परत मोल्ड होऊ शकत नाहीत. पण, भुरट्या चोरांना ‘कास्ट आयर्न’ व ‘डक्टाईल आयर्न’चा फरक कळत नाही व चोर्‍या मात्र होत राहतात.

दुसर्‍या विचारात झाकणांच्या ऐवजी संरक्षित जाळ्या बसवायला घेतल्या, पण या जाळ्यांचे काम फार विलंबाने होऊ घातले. २०२३ मध्ये फक्त १९०० मॅनहोलचे काम पूर्ण होऊ शकले. पण, मॅनहोलची संख्या आहे ७४ हजार, ते लक्षात घेता हे झाकणे बसवण्याचे काम नेमके कधी पूर्ण होणार? कारण, गेल्या पाच वर्षांमध्ये फक्त अडीच टक्केच काम पूर्ण झाले आहे. या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने न्यायालयाने पालिकेला आदेश दिले की, मॅनहोलना कायमस्वरुपी संरक्षित जाळ्या लावाव्यात आणि २०२४च्या पावसाळ्याच्या पूर्वी हेे काम संपविण्याचे निर्देशही दिले होते. पालिकेच्या मलजल विभागाने हे काम सर्व मॅनहोलकरिता जवळ जवळ संपविले. ६,३०८ मॅनहोलकरिता संरक्षक जाळ्या बसविल्या व उर्वरित मॅनहोलकरिता काँक्रीटची वा धातूची झाकणे बसवून झाली. त्यामुळे मॅनहोलमध्ये कोणी पडण्याची भीती नाहिशी झाली.

गेल्या वर्षी पालिकेने दुसरी एक कल्पना काढली व ‘स्मार्ट मॅनहोल’ची क्लृप्ती सूचली. १४ मॅनहोलकरिता सेन्सॉर वापरून ‘स्मार्ट मॅनहोल’ची संकल्पना राबविली गेली. जर या मॅनहोलना कोणी स्पर्श केला तर कंट्रोल केंद्राकडे अलार्म येईल आणि मग संबंधित मॅनहोलचा तपास घेता येईल. हा प्रकल्प १२ लाख किमतीचा होता. हा प्रकल्पही तांत्रिक कारणांनी फारसा यशस्वी ठरला नाही. हा प्रकल्प पालिकेने पुन्हा हातात घेण्याचे योजले आहे व पायलट प्रकल्प बी वॉर्डच्या सँडहर्स्ट रोडला व डी वॉर्डच्या ग्रँट रोडला करण्याचे ठरले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन मॅनहोलवरील झाकणचोरीवर नियंत्रण यावे. झाकणाला चोराचा स्पर्श झाल्यावर नियंत्रण कक्षाकडे शिट्टीच्या आवाजाने अ‍ॅलर्ट येईल आणि कोणीतरी चोरी करत आहे, हे कळेल, अशी यामागची संकल्पना आहे. मॅनहोल ओव्हफ्लो झाले तरी अशा अ‍ॅलर्टच्या माध्यमातून त्याची सूचना केंद्रपर्यंत पोहोचेल. मॅनहोलमध्ये सात ते आठ इंच साधनाने दीड फूट खाली बॅटरीच्या साहाय्याने ही प्रणाली बसविता येईल. या बॅटरीचे आयुष्य एक वर्षाचे राहील.


मॅनहोल झाकणांना विशिष्ट रंगांच्या खुणा?

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण मुंबईतील भुयारी गटारे वा मॅनहोल झाकणांनी वा संरक्षक जाळ्यानी बंद केले आहेत अथवा नाही, याचा आढावा पालिकेच्या वॉर्ड कार्यालयांनी घेतला आहे. या पाहणी दरम्यान मॅनहोलना विशिष्ट रंगाच्या खुणा किंवा विशिष्ट रंग देण्याचा विचार पुढे आला आहे. मुंबईत लाखांहून जास्ती मॅनहोल आसून ते वेगवेगळ्या विभागाचे व वेगवेगळ्या रंगाचे ठेवले आहेत. त्यामुळे ते कोणत्या विभागाचे आहेत ते रंगांवरून त्वरित कळावे, हा उद्देश आहे. ही झाकणे पण वेगळ्या विभागाची वेगळ्या आकारात चौकोनी, गोलाकार, आयताकृती आहेत. झाकण जर तुटले तर ते परत बसविण्यासाठी एक मिमीचा फरकही चालत नाही. यामुळे झाकण परत बसविण्यासाठी विलंब लागू शकतो.



शाळामार्गातील मॅनहोलवर नवीन झाकणे बसविणार

गेल्या अनेक महिन्यांपासून चेंबूरमधील कलेक्टर कॉलनी परिसरातील पदपथावरील जलभांड्यांची झाकणे तुटल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत ठेवून चालावे लागत होते. यासंदर्भात महापालिकेने या जलभांड्यांवर नवीन झाकणे बसविली. या कलेक्टर कॉलनीमध्ये खासगी व पालिकेच्या शाळा आहेत. या पदपथावरील झाकणे तुटली होती व पालिका झाकणे बसवण्याच्या कामाकडे कानाडोळा करत होती. पण, यासंदर्भात माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेनी नवीन झाकणे बसविली हे चांगले झाले. अशीच इतर ठिकाणी पण झाकणे बसविणे शिल्लक असल्यास मॅनहोलमध्ये पडण्याची भीती दूर करण्यासाठी तेथेही झाकणे वा जाळ्या बसवाव्या लागतील.


झोपडपट्ट्यांकरिता स्वच्छतागृहे

नवीन २० हजार शौचालये बांधणार असून, ५०० शौचालयांच्या सुशोभीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. झोपडपट्टी क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या शौचालयांची अवस्था सुधारण्याची आज नितांत गरज आहे. झोपडपट्टीतील व नवीन सार्वजनिक शौचालये सुविधायुक्त केली पाहिजेत. त्याकरिता २४ तास शौचालयांची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अशी सुविधायुक्त शौचालये व कम्युनिटी वॉशिंग मशीन देण्यात येणार आहे, असेही फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. त्यासोबत ‘गँगिंग लाईट’च्या माध्यमातून प्रकाशव्यवस्था निर्माण केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. महिलांकरिता २०० प्रसाधनगृहांची निर्मिती सुशोभीकरणाच्या कामातून करण्यात येणार आहे.



अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.