मुंबई : हिंदी बिग बॉस १८ चा विजेता आणि कथित स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने कोकणी माणसांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. मुनव्वरने कोकणी माणसाविषयी अपशब्द वापरले असून सामान्य माणसांसह राजकीय नेत्यांनी देखी त्याची चांगलीच कानउघाडणी केली आहे. यात भाजप पक्षाच्या नेत्यांनी तर त्याला थेट पाकिस्तानमध्ये पाठवण्याची धमकी दिली होती. सर्व स्तरांतून विरोधी आणि टीका झाल्यानंतर आता मुनव्वरने कोकणवासियांची व्हिडिओच्या माध्यमातून जाहिर माफी मागितली आहे.
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरने गेल्या आठवड्यात एक शो केला होता. त्यामध्ये त्याने कोकणी माणसांवर टीका केली होती. त्यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेत केलेल्या वक्तव्यामुळे वादाचे मोहळ उठले होते.
दरम्यान, मुनव्वरने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्याच्यावर सगळीकडून हल्लाबोल सुरू झाल्यानंतर त्याने वापरलेल्या अपशब्दाबाबत माफी मागितली. तो म्हणाला की, “शोमध्ये त्यावेळी कोकणाविषयी चर्चा झाली. माझ्या बोलण्यातून गैरसमज झाला. कोकणी समुदायाबद्दल मी काहीतरी चुकीचे बोललो असे काहींना वाटते. त्यांची मी चेष्टा केली असा गैरसमज झाला. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोकणावर माझे खूप खूप प्रेम आहे आणि मी माफी मागतोठ, असे फारुकीने स्पष्ट केले.