त्रिवेंद्रम : 'मुथूट फिनकॉर्प लिमिटेड'ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सादर केली आहे. 'व्यापारी विकास गोल्ड लोन' ही नाविन्यपूर्ण ऑफर व्यापाऱ्यांच्या विकसनशील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. व्यापारी समुदायाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करत असताना या योजनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना अतुलनीय लवचीकता आणि मूल्य प्रदान करेल.
दरम्यान, व्यापारी जास्तीत जास्त कर्ज मूल्य मिळविण्यासाठी त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा फायदा घेऊ शकतात. तसेच, त्यांच्या व्यवसायांना समर्थन देण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी आवश्यक निधी प्रदान करते. ही योजना मुदत ७ दिवसांपासून ते १२ महिन्यांपर्यंत व्यापाऱ्यांना अनुकूलन आवश्यकतांवर आधारित निर्णय घेण्याची संधी देते.
व्यापाऱ्यांच्या रोख प्रवाहाच्या अनुषंगाने व्यापार विकास गोल्ड लोन हे त्याच्या सुलभ दैनंदिन परतफेडीच्या पर्यायासह वेगळे आहे. ज्यामध्ये व्यापाऱ्यांना फक्त वापरलेल्या रकमेसाठी व्याज भरावे लागते. आकर्षक व्याजदरासह एकत्रित कर्ज योजना आर्थिक लवचिकता शोधणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते. यात कोणतेही प्रीपेमेंट शुल्क नाही आणि क्रेडिट इतिहास (CIBIL) निकष यामध्ये लवचिकता प्रदान करते.