कट्टरपंथींनी जातीवाचक शिवीगाळ करत केली तीन जणांना मारहाण!

    12-Aug-2024
Total Views |

Sahanarpur...
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील सहानपूर जिल्ह्यात कट्टरपंथी जमावाने अनुसूचित जातीतील तीन जणांवर हा हल्ला केला. शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट रोजी यही घटना घडली. हल्लेखोरांनी जातीवाचक शिवीगाळही केली. सहानपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्ल्यातील पीडितांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन इशाक, साहिल आणि असगरसह एकूण पाच हल्लेखोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 
सहारनपूरच्या नकुड पोलीस हद्दीतील खेडा अफगाण येथील घटना आहे. या प्रकरणात राजेश कुमार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, काही वेळापूर्वी त्यांचा एक इन्व्हर्टर चोरीला गेला होता. या संदर्भात राजेशचा भाऊ दयारामने ९ ऑगस्ट रोजी असगरचा मुलगा अज्जू, अयुबचा मुलगा शिब्बू, इशाक, साहिल आणि असगर यांची चौकशी केली. यावरून अज्जू, असगर, साहिल, शिब्बू आणि इशाक हे लालबुंद झाले आणि संतावले. त्यांनी दयाराम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
 
 
 
 
त्यावेळी दयारामने 'शिवीगाळ करू नका', असा आग्रह धरला. मात्र त्यावेळी आरोपींनी दयारामला फावडा, कुदळीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी त्याच गावातील ऋषीपाल नावाच्या युवकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने अज्जू, शिब्बू, साहिल, असगर आणि इशाक पुन्हा हातात शस्त्रे घेऊन ऋषीपालतच्या घरी गेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी ऋषीपालच्या आई, बहिणीला शिवीगाळ केली असल्याचा आरोप आहे.
 
आरोपींनी शिवागाळ केल्याने ऋषीपालने प्रतिकार केला. त्यावेळी ऋषीपालवर आरोपींनी हल्ला करण्यास सुरूवात केली. त्यावेळी ऋषीकांतचा भाऊ कार्तिक आणि काकी अनिता यांनी धाव घेतली. त्यावेळी आरोपींनी ऋषीकांत आणि इतर दोघांनाही बेदम मारहाण केली असल्यचा आरोप आहे. त्या तिघांनाही नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजेश कुमार यांनी आपल्या तक्रारीत अज्जू, शिब्बू, इशाक, असगर आणि साहिल यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाचजणांवर पोलिसांनी एफआरआय दाखल केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये, 191 (2), 115 (2), 352, 333 आणि 351 (2) अंतर्गत करवाई करण्यात आली आहे.