बांगलादेशात महिला वकील तूरीन अफरोज यांच्यावर हल्ला, कट्टरपंथींनी केस कापून केले अमानुष अत्याचार
10-Aug-2024
Total Views |
ढाका(Bangladesh Attack) : बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. याआधी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कट्टरपंथींनी बांगलादेश सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर बांगलादेशात हिंदू महिलांवर. युवकांवर तसेच शेख हसीनांच्या पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांवर हल्ले केले आहेत. अशातच आता बांगलादेशातील शेख हसीनांच्या आवामी पक्षासोबत जोडल्या गेलेल्या महिला वकील तूरीन अफरोज यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले आहेत.
शेख हसीनांची सत्ता असताना काही दोषी कट्टरपंथींविरोधात तूरीन यांनी गुन्हे दाखल केले होते. त्यांना शिक्षा देण्यात आली होती. हाच राग डोक्यात ठेऊन काही कट्टरपंथी जमावाने तूरीन अफरोज यांचे केस कापले त्यांना मारहाणही करण्यात आली होती. त्यांनी बांगलादेशातील मुक्ती संग्रामात अनेक अपराध्यांविरोधात आपल्या वकिलीच्या जोरावर कायद्याच्या बाजूने शिक्षा देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वकील तूरीन अफरोज यांच्यावर बांगलादेशी कट्टरपंथींनी हल्ला केला. त्यांच्या घरावर हल्ला केला. तसेच त्यांचे केसही कापण्यात आले आहेत. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तसेच त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला होता. हिजाब घातले नाही म्हणून काहींनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या पायावर पेन्सिलीने वार केले आहेत. मार लागलेल्या पायाचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. जर त्या कट्टरपंथींनी माझ्यावर बलात्कार केला असता तर एक १६ वर्षाच्या मुलीची आई म्हणून माझ्यावर काय बेतले असते हे मलाच ठाऊक आहे, असे तूरीन अफरोज एका माध्यमासोबत बोलत होत्या.