राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

अजित पवार गटाची मागणी

    01-Aug-2024
Total Views |
 
Raj Thackeray
 
मुंबई : राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अजित पवार गटाने पोलिसांकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी ही मागणी केली आहे. अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ही मागणी केली.
 
मंगळवार, दि. ३० जुलै रोजी अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहे. दरम्यान, या घटनेनंतर सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे.
 
या राड्यात एका मनसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते आता आमनेसामने आले आहेत. दरम्यान, अजित पवार गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
उमेश पाटील यांनी पोलिसांकडे ही मागणी केली असून राज ठाकरेच त्यांच्या पक्षातील एका कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर मनसेच्या २ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.