"एकतर ते राहतील किंवा..."; अमोल मिटकरी मनसेविरोधात आक्रमक, पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन
01-Aug-2024
Total Views |
अकोला : अमोल मिटकरींनी अकोला पोलिस अधिक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या गाडीवर मनसैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलं असून आता अमोल मिटकरींनी आता आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या अकोला पोलिस अधिक्षक कार्यालयाबाहेर कुटुंबासह ते आंदोलनाला बसले आहेत.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरींना मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कर्णबाळा दुनबळे हे मोकाट का फिरत आहेत? पोलिसांनी त्यांना सोडलं? असा सवाल त्यांनी केला आहे. माझ्यासारख्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीची दिवसाढवळ्या गाडी फोडतात आणि तीन दिवस झाले असतानाही आरोपींना अटक होत नाही. कर्नबाळा दुनबळे मला धमकी देतात. पण हे त्यांचं नाही तर संविधानाचं राज्य आहे. माझ्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनीच आदेश दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तरीसुद्धा त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना कोणाचं संरक्षण आहे? लवकरात लवकर त्यांच्या मुस्क्या आवळून पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. तसेच एकतर ते राहतील नाहीतर मी राहील, अशी चिथावणीही त्यांनी दिली आहे.