सामूहिक बलात्कार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा सहभाग?

    31-Jul-2024
Total Views |
gangraped-case-samajwadi-party-leader


नवी दिल्ली :        उत्तर प्रदेशमधील अयोध्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते मोईद खान आणि त्यांचा नोकर राजू यांच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मजूर कुटुंबातील पीडितेचा अश्लील व्हिडीओ बनवून पीडितेस ब्लॅकमेलीह करण्यात आले आहे. दि. ३० जुलै रोजी या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून गुन्हा नोंदवित दोघांनाही अटक करण्यात आली आहे.


दरम्यान, सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले सपा नेते मोईद खान यांच्या घरी जवळपास गेल्या १२ वर्षांपासून पोलीस चौकशी सुरू होती. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, दुकानात राजू आणि त्याचा मालक मोईद या दोघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यावेळी आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओदेखील बनविल्याचे तपासातून उघड झाले आहे. याबाबत कुणालाही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही पीडितेला देण्यात आली आहे.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, ही घटना अयोध्येतील पुरकलंदर पोलीस स्टेशन परिसरात घडली. समाजवादी पक्षाचे नेते मोईद खान यांचे भदरसा चौकी परिसरात बेकरीचे दुकान आहे. याच परिसरात ओबीसी समाजातील एक मजूर महिला आणि तिची १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी राहत असल्याचे कळाले आहे. सुमारे ७५ दिवसांपूर्वी पीडित मुलगी तिच्या आईसोबत मजुरीचे काम करून परतत होती. त्यानंतर नोकर राजू खान याने पीडितेला टोस्ट खाण्यासाठी दुकानात बोलावून सामूहिक बलात्काराचा कट रचला.

या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी हिंदू संघटनांचे आंदोलन सुरू झाले. भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह अन्य पक्षाचे सदस्यही पोलिस ठाण्यात जमा झाले आणि घोषणाबाजी करू लागले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांना शांत केले. तपासादरम्यान ही घटना ज्या भदरसा पोलीस चौकी परिसरात घडली ती आरोपी मोईद खानच्या मालमत्तेत असल्याचेही समोर आले आहे. आरोपी हा समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांच्या जवळचा असल्याचेही सांगण्यात येत आहे.