उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट! दाऊद शेखला ७ दिवसांची पोलिस कोठडी
31-Jul-2024
Total Views |
मुंबई : उरण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. दाऊद शेखने २२ वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या केली होती.
यशश्री शिंदेंची हत्या केल्यानंतर दाऊद शेख फरार झाला होता. मंगळवारी सकाळी पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून अटक केली होती. त्यानंतर त्याला बुधवारी पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. दाऊदवर एससी, एसटी कायद्यांमधील अत्याचार प्रतिबंधक कायदे लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यशश्री आणि दाऊद हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्या दोघांनाही एकदा भेटायचं होतं. या भेटीदरम्यान त्यांच्यात बोलणं झालं आणि ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून यशश्री शिंदेची हत्या करण्यामागे नेमकं कारण काय? हे तपासानंतर स्पष्ट होईल.