माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मा शिवसेनेत दाखल!
30-Jul-2024
Total Views |
मुंबई : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
सोमवार, २९ जुलै रोजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे तसेच शिवसेना पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात पीएस फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच अंधेरीमधील काही प्रश्न असतील तर ते सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील असेही सांगितले.