यशश्री शिंदेवर बलात्कार? मरणानंतरही पीडितेला यातना! पोस्टमार्टममध्ये धक्कादायक बाब उघड

    29-Jul-2024
Total Views |
 
Yashashri Shinde & Dawood Sheikh
 
 
मुंबई : उरण हत्या प्रकरणातील पीडित तरुणी यशश्री शिंदे हिचे पोस्टमार्टम रिपोर्ट पुढे आले असून यामध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपी दाऊद शेख अद्याप फरार आहे. पोलिसांची पथकं महराष्ट्रासह कर्नाटकमध्येही त्याचा शोध घेत आहेत.
 
यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली असून २७ जुलै रोजी रेल्वे स्थानकाजवळील झाडीत तिचा मृतदेह आढळला. हा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत होता. आरोपीने यशश्रीच्या संपूर्ण शरीरावर चाकूने वार केले होते. तिच्या छातीवर आणि गुप्तांगावर जखमा होत्या. शिवाय तिचा चेहरा पुर्णपणे चेंदामेंदा करण्यात आला होता.
 
हे वाचलंत का? -  शरद पवारांना महाराष्ट्रात मणिपूरसारख्या दंगली घडण्याची चिंता! काय म्हणाले?
 
त्यामुळे यशश्रीवर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आता तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट पुढे आला असून त्यात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू, आरोपीने तिच्या संपूर्ण शरीरावर चाकूने वार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली होती. त्यामुळे नराधम आरोपीने मरणानंतरही पीडितेला प्रचंड यातना दिल्या आहेत.