नालासोपारा येथे २५ महिलांशी विवाह करणाऱ्या फिरोजला अटक!

    29-Jul-2024
Total Views |

Firoz Shaikh, Nalasopara

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : 
(Nalasopara Marriage Case) विविध विवाह संस्थांच्या संकेतस्थळांवरून घटस्फोटित किंवा विधवा अशा २५ हून अधिक महिलांना हेरून खोटे लग्न रचणाऱ्या धर्माधाला पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज नियाज शेख असे त्याचे नाव असून तो महिलांशी ओळख तयार करायचा, नंतर त्यांच्याशी जवळीक साधून त्यांची आर्थिक फसवणूक करायचा. नालासोपारा येथील एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

हे वाचलंत का? : उरणच्या घटनेवर उबाठा गटाचे नेते म्हणतात! "राजकारण करायचं नाही!"
सनातन प्रभातच्या वृत्तानुसार नालासोपाऱ्यातील एका महिलेची संकेतस्थळावरून फिरोजशी ओळख असता फिरोजने तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्याकडून ६ लाख ५० हजार रुपये घेऊन त्याने पळ काढला. याप्रकरणी महिलेने फिरोजविरोधात तक्रार नोंदवली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वसई न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फिरोजला अटक केल्यानंतर त्याच्याकडून ३ लाख २१ सहस्र ४९० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.