मुंबई : भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक फोटो ट्विट करत अनिल देशमुखांची पोलखोल केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांना अडकवण्यासाठी आणि ईडीच्या कारवाईतून वाचण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला प्रस्ताव दिला होता, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय.
अहो @AnilDeshmukhNCP फोटोवरूनच अर्थ काढायचे तर हा घ्या अजून एक फोटो गृहमंत्री सारख्या अंत्यत जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्ताने असे बेजबाबदार पणे वागणं शोभत नाही. खरच काही ठोस पुरावे असतील तर न्यायालयात जा अकारण फेक नॅरेटीव्ह पसरवू नका pic.twitter.com/l6fnzTJ7SA
अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि समित कदम यांचा फोटो दाखवत समित कदमच्या माध्यमातून फडणवीसांनी मला निरोप पाठवल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता केशव उपाध्येंनी आदित्य ठाकरेंचा समित कदमांसोबतचा एक फोटो पोस्ट कर अनिल देशमुखांची पोलखोल केली आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, "तुमच्याकडे एवढेच पुरावे असतील तर ते कोर्टात द्यायचे असतात. तुमचं बोलणं हास्यास्पद आहे. गृहमंत्री सारख्या अंत्यत जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्ताने असे बेजबाबदार पणे वागणं शोभत नाही. त्यामुळे अशा प्रकारे राजकारण करु नका आणि खोटा नरेटिव्ह पसरवू नका," असे ते म्हणाले.