छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्रानी हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहे. शनिवारी दुपारी २ वाजता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
आज सकाळी रामा हॉटेल छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे आदरणीय माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी भवन संभाजीनगर येथे पवार साहेबांच्या उपस्थितीत 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' पक्षात माझा प्रवेश होणार आहे. pic.twitter.com/pN1FSmcnO3
बाबाजानी दुर्रानी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "आज सकाळी रामा हॉटेल छत्रपती संभाजीनगर येथे आदरणीय माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली. आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादी भवन संभाजीनगर येथे पवार साहेबांच्या उपस्थितीत 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' पक्षात माझा प्रवेश होणार आहे."
दरम्यान, विधानसभा निवडणूकीला आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांची इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु आहे. यातच आता अजित पवारांचे आमदार बाबाजानी दुर्रानी हेदेखील शरद पवार गटात जाणार आहेत.