"लाडकी बहीण योजनेमुळे मविआच्या पोटात दुखतंय!"

    26-Jul-2024
Total Views |
 
Sanjay Raut
 
मुंबई : लाडकी बहीण योजनेमुळे मविआच्या नेत्यांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. शुक्रवारी संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. यावर आता नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
 
नितेश राणे म्हणाले की, "लाडकी बहीण योजना ही महायूती सरकारची अतिशय लोकप्रिय योजना होत आहे. राज्यातील माता-भगिनींना आधार देणारी ही योजना आहे. जेव्हापासून ही योजना जाहीर झाली तेव्हापासून महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या पोटात दुखायला लागलं आहे. राज्यातील माता-भगिनी आर्थिक सक्षम होत असताना त्यांना बघवत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार गट हे सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत."
 
हे वाचलंत का? -  श्याम मानव इंडिया आघाडीचा प्रचार करणार!
 
"आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद करू, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे राज्यातील माता-भगिनींनी हे काळजीपूर्वक ऐकावं. एकीकडे आमचं महायूतीचं सरकार लाडकी बहीण योजना आणून आपल्याला आर्थिक सक्षम करु पाहते. पण चुकून जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर, ते ही योजना बंद करतील. त्यामुळे या गोष्टींची दखल घ्यावी. राज्यात काही चांगलं होत असल्यास ते मविआच्या नेत्यांना बघवत नाही," असेही नितेश राणे म्हणाले आहेत.