जलाभिषेक करून परतणाऱ्या कंवरियांवर धर्मांधांचा हल्ला!
24-Jul-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : (Kawad Yatra Stone pelting News) झारखंडमध्ये कावड यात्रेकरूंवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भगवान शंकराला जलाभिषेक करून परतणाऱ्या कंवरियांच्या ट्रेनवर दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. ही घटना रांची ते लोहरदगा दरम्यान घडली. याप्रकरणाचा तीव्र निषेध करत कंवरियांनी निदर्शने केली आहेत. हल्ल्याचा आरोप गैर-हिंदूंवर करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहरदगा जिल्ह्यातील कंवरियांचा एक गट रांची येथील पहाडी महादेव मंदिरात गेला होता. तिथून परतताना वाटेत काही तरुणांनी त्यांच्यावर अशोभनीय कमेंट करून हाणामारी सुरू केली. त्यांना मारहाण, शिवीगाळ आणि लूटमारही करण्यात आली. मार्गावरील अनेक स्थानकांपर्यंत हा लढा सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे. कंवरियांनी भरलेल्या ट्रेनवर दगडफेक केल्याचीही माहिती आहे.
या घटनेने संतप्त झालेल्या कंवरियांनी लोहरदगा येथे पोहोचून निदर्शने करून कारवाईची मागणी केली. झारखंडचे भाजप प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून पोलिसांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले, “रांचीच्या पहाडी मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी आलेल्या कंवरियांवर रांची-लोहारदगा ट्रेनमध्ये प्राणघातक हल्ला आणि दगडफेक झाल्याची माहिती आहे. वरील घटना असामाजिक तत्वांनी २-३ स्थानकावर घडवून आणली आहे. यासंदर्भात उचित कारवाई व्हायलाच हवी."