आर्थिक सर्व्हेक्षण : जगात भारत दुपटीने पुढे, बेरोजगारीसह महागाईत घट!

    22-Jul-2024
Total Views |
economic survey indian economy


नवी दिल्ली :         देशातील एकूण आर्थक स्थितीचा आढावा घेणारा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ८.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६.५ ते ७ टक्के दराने अर्थव्यवस्था वाढेल, असा अंदाज यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आर्थिक पाहणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महागाईही कमी झाल्याचे दिसून आले आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ मध्ये देशातील महागाईचा दर ६.७ टक्के इतका नोंदविण्यात आला होता. तर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ५.४ टक्के इतका महागाईचा दर असेल. मात्र, काही खाद्यपदार्थांचे भाव चढेच राहिले असले तरी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही अहवालात म्हटले गेले आहे. २०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणात भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत दुपटीने वाढ नोंदवेल, असा अंदाज आहे.

तरुणांमध्ये रोजगाराच्या निमित्ताने व्यावसायिक कौशल्ये नसल्याने रोजगार संधी मिळत नव्हती. तसेच, आर्थिक सर्वेक्षणानुसार, सध्या पदवीधर झालेल्या तरुणांमध्ये कौशल्य नसल्यामुळे ते कामासाठी योग्य नाहीत. या स्थितीत सतत सुधारणा होत असून कौशल्यविकासावर अधिक भर देण्यात येत आहे. याशिवाय चालू खात्यातील वित्तीय तूटही कमी झाली असून २०२२-२३ या आर्थिक वर्षात जीडीपीत २ टक्क्यांवरून ०.७ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.