राहुल गांधींच्या प्रकरणात कर्नाटक काँग्रेसच्या धमकीनंतर आता तामिळनाडूमध्ये गुन्हा दाखल !

    20-Jul-2024
Total Views |
after-karnataka-now-fir-against-youtuber
 

नवी दिल्ली :       युट्युबर अजित भारती यांच्याविरोधात तामिळनाडू पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. या एफआयआर अंतर्गत भारती यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही तक्रार चेन्नई पूर्व येथील काँग्रेस पक्षाचे प्रादेशिक अध्यक्ष एम सॅम्युअल द्रवियन एमसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिर पाडून त्या जागी बाबरी मशीद उभारतील, असा दावा अजित भारती यांनी केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

दरम्यान, कर्नाटकानंतर आता तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींशी संबंधित प्रकरणात यूट्यूबर अजित भारतीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिर पाडून त्या जागी बाबरी मशीद उभारतील, असा दावा अजित भारती यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एफआयआरमध्ये युट्युबवर धार्मिक भावना भडकवण्याच्या आणि लोकांमध्ये द्वेष पसरवण्याच्या दुर्भावनापूर्ण हेतूने चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात ‘एक्स’ला ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता’ अंतर्गत नोटीसही बजावण्यात आली आहे. ज्या पोस्ट संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित भारती यांच्या विरोधात तत्कालीन आयपीसी (भारतीय दंड संहिता) कलम १५३ ए (धर्म, भाषा इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये संघर्ष निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्याविरुद्ध आयपीसीचे कलम ५०५(१)(बी) देखील लागू करण्यात आले आहे.

युट्युबच्या माध्यमातून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने कोणतेही विधान जारी केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. अजित भारतीच्या हँडलबाबत ‘एक्स’कडून डिव्हाइस, लॉगिन-आउट वेळ आणि ईमेल-फोन नंबर अशी अनेक माहिती मागवण्यात आली आहे. ज्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, त्या खटल्याला स्थगिती दिल्यानंतर प्रकरण पुन्हा दुसऱ्या राज्यात आणायचे, या कथित घटनेचे काय? कर्नाटक सरकारने एनसीआरमधील त्याच्या फ्लॅटजवळ काही पोलिसांना पाठवले होते, असे अजित भारती यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.