प्रभावती बावनकुळे अनंतात विलीन!

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कुटुंबीयांचे अश्रू अनावर

    02-Jul-2024
Total Views |
 
Bawankule
 
नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आई प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांच्यावर कोराडी येथील कोलार नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप देत श्रद्धांजली अर्पण केली. सोमवारी दुपारी अल्पआजाराने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
 
त्यांच्या पश्चात पती कृष्णराव तसेच चंद्रशेखर, नारायण, यदुनंदन, नंदकिशोर (बापू) या मुलांसह सुना आणि नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. प्रभावती यांच्या निधनाचे वृत्त समजताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी रात्री कोराडी येथील बावनकुळेंच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. राहुल कुल यांनीही त्यांच्या शोकसंवदेना व्यक्त केल्या. आज मंगळवारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
 
हे वाचलंत का? - सरकार पडावं म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले!
 
कोलार नदी घाटावर झालेल्या शोकसभेत वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप. पंकज महाराज गावडे व भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. चैनसुख संचेती यांनीही शोक संवदेना व्यक्त केल्या. आ. आशिष जयस्वाल, आ. मोहन मते, आ. टेकचंद सावरकर, आ. प्रवीण दटके, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, डॉ. राजीव पोतदार, डॉ. उपेंद्र कोठेकर, रवींद्र भुसारी, सुनील देशपांडे, संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार सुधीर पारवे, डॉ. आशिषराव देशमुख, मल्लिकार्जून रेड्डी, अशोक मानकर, राजू पारवे, प्रकाश गजभिये, माजी जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर, अशोक धवड, मिलिंद माने, डॉ. बबनराव तायवाडे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, तामीळनाडूच उद्योजक ए, जोसेफ स्टॅलीन, जयप्रकाश गुप्ता, वीज वितरण कंपनीचे संचालक विश्वास पाठक, प्रदेश सचिव किरण पाटील, मनोहर कुंभारे, शैलेश जोगळेकर, डॉ. पीनाक दंदे, संपादक संजय तिवारी, अतुल पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने हजारो नागरिक उपस्थित होते.