सेवा भारतीतर्फे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

    19-Jul-2024
Total Views |

Seva Bharati Arogya Shibir

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sewa Bharati Arogya Shibir)
सेवा भारती आणि नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन (एनएमओ) यांच्या सहकार्याने विविध माध्यम संस्थांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. २१ जुलै रोजी सेवा भारती डायग्नोस्टिक अँड डायलिसिस सेंटर, वढेरा भवन, अशोक विहार, सत्यवती महाविद्यालयाजवळ, नवी दिल्ली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत चालेल.

हे वाचलंत का? : रेल्वे अपघातग्रस्तांना संघ स्वयंसेवकांचा मदतीचा हात

या शिबिराचा मुख्य उद्देश पत्रकारांचे आरोग्य सुनिश्चित करणे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा प्रदान करणे हा आहे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचे निदान आणि सल्ला घेण्यासाठी ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमधील तज्ञ डॉक्टर्स शिबिरात उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत चाचण्या केल्या जातील.

“हे शिबिर पत्रकारांना तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेण्याची आणि त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्याची मौल्यवान संधी प्रदान करते. अशा उपक्रमांमुळे पत्रकारांमध्ये त्यांच्या व्यस्त जीवनात आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण होण्यास मदत होते”, असे मत सेवा भारती, दिल्ली प्रचार प्रमुख, भूपेंद्र कुमार यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले, "आमच्या पूर्वीच्या वैद्यकीय शिबिरांमध्येही पत्रकार तपासणीसाठी आले होते, परंतु त्यांच्या सूचनांनुसार आम्ही विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन केवळ पत्रकार बांधवांसाठी करत आहोत. या शिबिरात ७० हून अधिक पत्रकार उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. या वैद्यकीय शिबिरासाठी पत्रकारांना नोंदणी करण्याची गरज नाही; त्यांनी त्यांच्या माध्यम संस्थेद्वारे जारी केलेले आय-कार्ड आणणे आवश्यक आहे. एनएमओ आम्हाला या शिबिरासाठी डॉक्टर उपलब्ध करून देत आहे. भूपेंद्र कुमार यांनी सांगितले."