इम्तियाज जलील यांच्या मोर्चापूर्वी सकल हिंदू समाजाचा इशारा
18-Jul-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sakal Hindu Samaj Kolhapur) विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने दोन गटांत झालेले वाद हिंसक वळणावर येऊन पोहोचले. या प्रकाराच्या निषेधार्थ एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दि.१९ जुलै रोजी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. मात्र याला हिंदुत्ववादी संघटनांकडून जोरदार विरोध दर्शवण्यात आला आहे. 'इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात येऊन मोर्चा काढला तर कोल्हापुरी पायताणाने त्यांच स्वागत करू', असा इशारा सकल हिंदू समाज आणि हिंदू एकता संघटनेच्या वतीने नुकताच देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगड परिसरात अतिक्रमणे होत आहेत. ती हटवण्याची मागणी शिवभक्त करत असतानाही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे शिवभक्तांचा उद्रेक झाला आणि सोमवारपासून विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यात सुरुवात झाली. असे मत सकल हिंदू समाजाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
जशास तसे उत्तर मिळेल!
औरंग्याच्या थडग्यावर जाऊन नतमस्तक होणारा इम्तियाज जलील मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक-ए-रेहान याच्यासाठी मोर्चा काढत आहे. हे देशद्रोही प्रवृत्तीचे लोक आहेत. शिवभक्तांवर पहिला सशस्त्र हल्ला मुळात यासिम भटकळशी लागेबांधे असणाऱ्या मलिक-ए-रेहानच्या भक्तांनी केला. त्याच्या समर्थनार्थ जलील मोर्चा काढत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जलीलच्या येण्यावर बंदी घालावी. त्याने कोल्हापूरात प्रवेश केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल.
- नितिन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन व निमंत्रक, विशाळगड मुक्ती आंदोलन
अतिक्रमण नव्हे आक्रमण...
शिवशंभू विचार मंच छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे कार्य करत आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले हा तमाम शिवभक्तासाठी आस्थेचा, श्रद्धेचा विषय आहे. आपल्या श्रद्धा, परंपरा, संस्कृती, वारसा यांचा आदर करण्याचा व रक्षण करण्याचा घटनादत्त अधिकार आपल्याला लाभला आहे. या भावनेने तमाम शिवभक्त विशाळगड मुक्तीसंग्रामाशी जोडला गेलेला आहे. आज विशाळगडावरून राजकीय पक्ष मूळ मुद्द्याला बगल देऊन अन्य विषयावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राजकीय फायदा घेताना दिसत आहेत. त्या सगळ्यांना एकच सांगणे आहे की, मुळ मुद्द्याला कोणीही बगल देऊ नका. विशालगडावर अनधिकृत बांधकाम झालेले आहे, तसेच त्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी यासीन भटकळ या बॉम्बस्फ़ोटतील आरोपीला आश्रय देण्यात आलेला होता. हे केवळ एखाद्या किल्ल्यावरील अतिक्रमण नसून देशाच्या आस्थेवर, वारशावर, परंपरेवर, देशाच्या सार्वभौमत्वावर असलेलं अतिक्रमण नव्हे नव्हे आक्रमण आहे. त्यामुळे विशालगड या अतिक्रमणातून मुक्त झालाच पाहिजे पण त्याचबरोबर सर्व ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणांवरील अतिक्रमण हे हटवले गेलेच पाहिजेत. या परिस्थितीत राजकीय हेतूने आंदोलन करणाऱ्या एमआयएमने आपण राष्ट्रद्रोह्यांच्या बाजूने आहोत की राष्ट्रभक्तांच्या बाजूने आहोत हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. एमआयएम ने हे पण लक्षात ठेवावे की, मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन खंडिभर गनिमांचा बिमोड करणाऱ्या छत्रपती शिवरायांचेच आम्ही वारसदार आहोत. कितीही संघर्ष करावा लागला तरी मैदानात पाय रोवून सर्व किल्ल्याना लँड जिहाद मधून मुक्त केल्याशिवाय शिवभक्त थांबणार नाही.
- अभयराजे जगताप, कोकण प्रांत संयोजक, शिवशंभू विचार मंच