घरवापसी! शाझिया बनली सपना; १४ लोकांनी केला हिंदू धर्मात प्रवेश

    18-Jul-2024
Total Views |
 khajrana
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात असलेल्या खजराना मंदिरात १४ मुस्लिम धर्मीय लोक स्वेच्छेने हिंदू धर्मात परतले आहेत. मंदिरात विधीप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. घरवापसी करणाऱ्यांनी सनातनचा स्वीकार करून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की या धर्माला ना आरंभ आहे आणि ना अंत आहे. यामुळे ते हिंदू धर्मात येत आहे.
 
शाझिया हाशमी जी की आता सपना बनली आहे. तिने सांगितले की ती कोणाच्याही दबावाशिवाय हिंदू धर्म स्वीकारत आहे. तिला हा धर्म खूप आवडतो, म्हणून तिने हा निर्णय घेतला. घरवापसी करण्यापूर्वी सगळ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती. या १४ लोकांपैकी २ मंदसौरचे रहिवासी आहेत आणि काही इंदूरच्या खजराना येथील आहेत. या लोकांनी म्हटले आहे की हे लोक ते आधीच्या धर्मातील विविध प्रकारच्या दुष्कृत्यांमुळे त्रस्त होते, म्हणून ते हिंदू धर्मात आले.
 
माध्यमांशी संवाद साधताना एका घरवापसी केलेल्या महिलेने सांगितले की, "लहानपणापासून मंदिरात जाणे आणि हिंदू ज्या पद्धतीने पूजा करतात ते पाहणे मला आवडते आणि आमच्या मुस्लिम समाजात असा कोणताही कार्यक्रम नाही. याशिवाय मुस्लिम महिलांना मशिदीत जाण्यास बंदी आहे." याच कारणांमुळे त्यांनी मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारल्याचेही त्या सांगतात.