नंदुरबार:नंदुरबारमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. या पिकाचे उत्पन्न घेतल्यानंतर मार्केटमध्ये हवा तसा दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांने सोयाबीनची साठवणूक केली होती. आज नाही तर उद्या सोयाबीनचे भाव वाढतील या उद्देशाने बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक घरातच करुन ठेवली होती. मात्र पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे.
आणि त्यामुळे मार्केटमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. तर शेतकऱ्यांना सोयाबीनचा किमान ५ हजार भाव अपेक्षित होता. पण सध्या सोयाबीनला साडेचार हजार दर मिळत आहे. काही शेतकरी घरामध्ये साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत. त्यामुळे शहादा बाजार समितीत रोजचे ५० ते ६० क्विंटल सोयाबीनची आवक होत आहेत.