शेअर बाजारासह बँकांना उद्या सुट्टी जाहीर

    16-Jul-2024
Total Views |

Sheyar Market
 
मुंबई : बुधवारी अर्थात १७ जुलैला देशभरातील बँका बंद राहणार आहेत. तर शेअर बाजारालाही सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेशी संबधित कोणतीही कामे असतील तर नागरिकांनी ती आजच करुन घ्यावीत कारण उद्या देशभरातील बहुतेक बँकांना सुट्टी असणार आहे. तर बुधवारी शेअर बाजार देखील बंद राहणार आहे. मार्केटमध्ये उद्या कोणतेही व्यव्हार होणार नाहीत. सुट्यांच्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार देशातील सर्वच भागांमध्ये उद्या बँका बंद असणार आहेत.
 
दरम्यान बिहारमध्ये याच्याआधी १८ जुलैला मोहरमनिम्मित सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला असून १७ जुलैला सुट्टी आहे. महाराष्ट्रात आषाढी एकादशी , याशिवाय अन्य राज्यांमध्ये मोहरमसह आशूरा यू तिरोज यांसारखे उत्सव साजरे केले जाणार आहेत. परिणामी या सणांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर , मेघालय, राजस्थान , आंध्रप्रदेश , तेलंगणा , कर्नाटक , मध्य प्रदेश या राज्यातमध्ये देखील बँकांना सुटटी असणार आहे.