“मराठी ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये मी विजेती आणि सोबत हवे ‘हे’ सदस्य”, नेहा शितोळे डिझाईन करणार नवा सीझन?

Total Views | 43
 
big boss
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
 
मुंबई : लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चे देशातच नाही तर जगभरात चाहते आहेत. मराठी बिग बॉसच्या आजवरच्या चार सीझनमध्ये सर्वच स्पर्धकांनी राडा घातला होता. आणि त्यानंतर आता २८ जुलै पासून बिग बॉसचा ५ वा सीझन भेटीला येत आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनची स्पर्धक नेहा शितोळे हिने मात्र सहावा सीझन डिझाईन करण्याची संधी मिळाली तर सोबत कोणते सदस्य हवे याची यादीच दिली आहे. अभिनेत्री-लेखिका नेहा शितोळे हिने नुकतीच ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा’ या भागात हजेरी लावली होती. यावेळी तिने सीझन सहाची कास्टिंग सांगत ती स्वत:च विजेती असणार हे देखील गमतीत घोषित केले.
 
नेहा शितोळे म्हणाली की, “ ‘बिग बॉसचा ६’ वा सीझन डिझाईन करण्याची संधी जर का मला मिळाली जर त्या घरात माझ्यासोबत माधव देवचक्के, शिवानी सुर्वे, आरोह वेलणकर, रेशम टिपणीस, आस्ताद काळे, सुशांत शेलार, उषा नाडकर्णी, सुरेखा पुणेकर, अभिजित केळकर, विद्याधर जोशी, मीरा जगन्नाथ, विशाल निकम, जय दुधाणे, अमृता देशमुख, रुपाली भोसले, तेजस्विनी लोणारे, मेघा घाटगे या सदस्यांना घेऊन मराठी बिग बॉसचा ६ वा सिझन करायला आवडेल”, आणि त्याची विजेती मीच असेल असे देखील नेहा गमतीने म्हणाली.
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121