"मराठ्यांबद्दल कळवळा दाखवणाऱ्यांचा जाणीवपूर्वक बैठकीला दांडा का?" शंभुराजे विरोधकांवर बरसले!

    10-Jul-2024
Total Views |
 
Shambhuraj Desai
 
मुंबई : बाहेर मराठा समाजाबद्दल कळवळा दाखवणाऱ्यांनी जाणीवपूर्वक सर्वपक्षीय बैठकीवर जाणीवपूर्वक टाकला. त्यांचा खरा चेहरा आता पुढे आला आहे, असे म्हणत मंत्री शंभुराज देसाईंनी विरोधकांवर संताप व्यक्त केला. मराठा आरक्षणसंबंधी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर आज हा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला.
 
यावर बोलताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचं लेखी निमंत्रण दिलं होतं. काही नेत्यांनी आम्हाला येता येणार नाही आम्ही ऑनलाईन जॉईन होतो, असं सांगितलं. त्यानुसार त्यांना लिंकसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आली. पण एकाएकी ६ वाजता आम्ही या बैठकीला येणार नाही असं त्यांनी सांगितलं."
 
हे वाचलंत का? -  विरोधकांचा 'बोलवता धनी' कोण? आशिष शेलारांचा सवाल
 
"हे सरकार निर्णय घेत नाही, आरक्षण देत नाही असं ते बाहेर सांगतात. मात्र, या विषयावर सगळ्या राजकीय पक्षाचं मत जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अडीच ते तीन तास ही बैठक चालली पण महाविकास आघाडीचे तीन प्रमुख नेते या बैठकीला आले नाहीत. बाहेर म्हणायचं की, आम्हाला या समाजाबद्दल कळवळा आहे, पण जेव्हा त्यांचे प्रश्न सोडवण्याची वेळ आली होती तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक बैठकीवर बहिष्कार टाकला," असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
 
ते पुढे म्हणाले की, "आता मनोज जरांगेंसमोर या लोकांचे चेहरे आले आहेत. त्यामुळे ज्यांना यात राजकारण करायचं आहे त्यांना जरुर करु द्या. पण महायूती सरकारने दिलेला शब्द हे सरकार जरून पूर्ण करेल," असे आश्वासनही शंभुराज देसाईंनी सभागृहात दिले.