मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ' तुफान' आले होते. शेअर बाजारात निवडणूक निकालपूर्वी काळात जबरदस्त वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात सकाळची रॅली कायम राहून बाजाराने मोठी पातळी गाठली आहे. बंद होताना सेन्सेक्स २५ ०७.४७ अंशाने वाढत ७६४६८.७८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ७३३.२० अंशाने वाढत २३२६३.९० पात ळीवर पोहोचला आहे. आज बीएसई व एनएसईत ३.३९ व ३.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅप मध्ये ३.६४ व २.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर निफ्टी २.९८ व २.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.बीएसई बँक निर्देशांकात २५ १८.७५ अंशाने वाढत ५८२९०.४७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात १९९६.०० अंशाने वाढ होत ५०९७९. .९५ पातळीवर पोहोचला आहे.दोन्ही बँक निर्देशांकात अनुक्रमे ४.५२ व ४.०७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये सकाळप्रमाणेच कुठल्याही समभागात घसरण झालेली नाही.अखेर सर्वाधिक वाढ बँक (४.०७%), फायनाशियल सर्विसेस (४.४%), एफएमसीजी (४.३७%), रियल्टी (५.९५%), तेल गॅस (६.८१%), पीएसयु बँक (८.४०%), मेटल (३.३४%) समभागात वाढ झाली आहे.
आज बीएसईत एकूण ४११५ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २३३९ समभाग वधारले आहेत तर १६२१ समभागात घसरण झाली आहे. त्यातील २८४ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ झाली आहे तर ६८ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ३७१ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३०२ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
आज एनएसईत एकूण २८०६ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १७४५ समभाग वधारले असून ९४७ समभागात घसरण झाली आहे. त्यातील २१३ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे तर ५० समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. २२५ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ९० समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.बीएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२५.९४ लाख कोटींवर पोहोचले आहेत. एनएसईवरील कंपन्याचे बाजार भांडवल ४२२.४८ लाख कोटींवर पोहोचले आहे.आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ झाल्याने अखेरीस रुपया ८३.५० प्रति डॉलर स्थिरावला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात सकाळपर्यंत मोठी घसरण झाली होती. मध्यपूर्वेतील सिझफायर व शांतता प्रस्थापित झाल्याने व युएस मधील सकारात्मक पीसीई (Personal Consumption Expenditure) आकडेवारी आल्यानंतर बाजारातील सोने घसरले होते. परंतू आज संध्याकाळपर्यंत डॉलर घडल्यानंतर मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या निर्देशांकात ०.०३ टक्क्यांनी वाढ झाली होती. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संध्याकाळपर्यंत भारतातील एमसीएक्स निर्देशांकात ०.२० टक्क्यांनी घसरण होत सोने ७१६९० पातळीवर पोहोचले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या (क्रूड) तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. ओपेक राष्ट्रांच्या बैठकीत कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट पुढे ढकलली गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या तेलाच्या ट्रेंडमध्ये बदल होत तेलाचे भाव स्थिरावले आहेत. तसेच आशियाई बाजारात तेलाच्या मागणीत घट झाल्याने बाजार स्थिर झाले. WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.२३ टक्यांनी घट झाली आहे तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.२० टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स निर्देशांकात तेलाच्या निर्देशांकात ०.९३ टक्क्यांनी घसरण होत तेल प्रति बॅरेल ६३९३.०० पातळीवर पोहोचले आहे.
आज शेअर बाजारात न भूतो ना भविष्यती अशी वाढ झाल्याने सकारात्मकता भरभरून वाहत होती. सकाळपासून २००० अधिक अंशाने रॅली झाल्याने कुठल्याही क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली नाही. किंबहुना अनेक समभागात ३ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. उद्या निवडणूक निकाल असल्याने एक दिवस आधी बाजारात मोदी सरकार पुन्हा येणार या भावनेने बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याचबरोबर नुकतेच भारतीय अर्थव्यवस्थेतील दणक्यात आलेले जीडीपीची आकडेवारी तसेच बाजारातील आज वीआयएक्सची वरील पातळी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तुलनात्मकदृष्ट्या स्थिरतेचे चित्र, एक्झिट पोलचे आलेली आकडेवारी, रुपयातील वाढ, क्रूड तेलात घसरण, आगामी काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारताच्या बाजारात विश्वास दाखवण्याची शक्यता अशा अनेक कारणांमुळे बाजारात मोठी वाढ झाली आहे. परि णामी सेन्सेक्स व निफ्टीने नवा उच्चांक गाठला आहे. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ३ ते ४ टक्क्यांनी वाढ झाल्याने बाजारात नवी उंची गाठता आली. लार्जकॅप समभागात देखील मोठी वाढ झाल्याने बाजारात एक निश्चित पातळी निर्माण झाली होती.
या ५ कारणांमुळे बाजारात वाढ -
१) एक्झिट पोल - एक्झिट पोलच्या निश्चित अंदाजामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात विश्वास दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाचे एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता दर्शविली असताना बाजारातील स्थिरतेचा अंदाज व्यक्त झाला आहे.
२) जीडीपीचे आकडे- भारतातील सांख्यिकी मंत्रालयाने भारताचा गेल्या तिमाहीत ७.८ टक्के व संपूर्ण वर्षासाठी ८ टक्क्यांनी जीडीपीत वाढ झाल्याचे स्पष्ट केल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास द्विगुणित झाला आहे.
३) जीएसटी कलेक्शन - जीएसटी कलेक्शनमध्ये १.७३ लाख कोटींचे ऐतिहासिक वाढ झाली असल्याने बाजारातील सरकारप्रति नवीन विश्वास बाजारात गुंतवणूकदारांनी व्यक्त केला होता. यापूर्वी जीएसटी कलेक्शनमध्ये २ लाख कोटीची वाढ झाली होती.
४) तेलात घसरण - ओपेक राष्ट्रांच्या बैठकीपूर्वी बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढउतार अधिक प्रमाणात होत होती. किंबहुना ओपेक राष्ट्रांच्या बैठकीत तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय ही मध्यपूर्वेतील राष्ट्रे घेतील असा सगळ्यांचा अंदाज होता मात्र कालच्या बैठकीत उत्पादनातील कपात करण्याचा निर्णय पुढे ढकलल्यानंतर बाजारात नवीन दिलासा मिळाल्याने बाजारात वाढ झाली तसेच कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही घसरण झाली होती.
५) जूनमध्ये परदेशी गुंतवणूकीची मोठीं शक्यता - अनेक तज्ञांनी नवीन सरकार आल्यानंतर परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात. कारण गेल्या काही दिवसांत वीआयएक्स निर्देशांकात अतिरिक्त चढ उतार होत असताना निकालापूर्वीची अनिश्चितता कायम होती. या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक भारतातून काढून घेतली होती. आता आरबीआय जून जुलैत व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याने या गुंतवणूकीत आणखी भर पडू शकते. परिणामी बाजारात विश्वास वाढला आहे.
आज बीएसईत एसबीआय, एनटीपीसी,पॉवर ग्रीड, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, एम अँड एम, एक्सिस बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्लू स्टील, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, विप्रो, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, आयटीसी, टायटन कंपनी, नेस्ले या समभागात वाढ झाली आहे तर एचसीएलटेक, एशियन पेंटस या समभागात घसरण झाली आहे.
आज एनएसईत अदानी पोर्टस, एनटीपीसी, एसबीआय,पॉवर ग्रीड, ओएनजीसी, अदानी एंटरप्राईज, श्रीराम फायनान्स, लार्सन,बीपीसीएल, रिलायन्स, एक्सिस बँक, एम अँड एम, इंडसइंड बँक, कोल इंडिया, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक,बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, बजाज ऑटो,एचडीएफसी , ग्रासीम, कोटक महिंद्रा, टेक महिंद्रा, हिंदा ल्को, आयटीसी, टीसीएस, हिरो मोटोकॉर्प, मारूती सुझुकी,टायटन कंपनी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, सिप्ला, डिवीज, अपोलो हॉस्पिटल, नेस्ले या समभागात वाढ झाली असून आयशर मोटर्स, एचसीएलटेक, एशियन पेंटस, सनफार्मा, ब्रिटानिया, डॉ रेड्डीज, इन्फोसिस या समभागात घसरण झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, ' जवळजवळ सर्व एक्झिट पोलने निवडणुक निकाल भाजपच्या बाजूने पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्याचा परिणामतः आज बाजारात निर्देशांकातील जास्तीत जास्त वेटेज असलेले स्टेट बँक,रिलायन्स,एचडीएफसी बॅक व बजाज फायनान्स या दिग्गजांकडून निर्देशांक ४% वर गेला साथीला जवळजवळ सर्व कंपन्यांत तेजी दिसून आली. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर ही तेजी काही दिवस राहील पण त्यानंतर नफा वसुली अपेक्षेत आहे.पीएसयु व डिफेन्स यामधील तेजी ही बराच काळ राहील. बाजारातील विदेशी संस्थांच्या सहभागाकडे लक्ष ठेवून पुढील वाटचालीचा अंदाज घ्यावा लागेल व पुढील आठवड्यात बाजार कशी वाटचाल करेल ते पहाणे आवश्यक आहे. उद्याचे निकाल सरकारची स्थिरता व पुढील धोरणांकडे बाजार नजर ठेवून असणार आहे.'
निफ्टीविषयी विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, 'एक्झिट पोलनंतर निर्माण झालेल्या उत्साहामुळे निफ्टीने दिवसाची सुरुवात दैनंदिन चार्टवरील पूर्वीच्या स्विंग उच्चांकातून बाहेर पडून केली. ही भावना उद्याच्या निवडणूक निकालांवर जास्त अवलंबून राहते. जर निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलशी जुळले किंवा एक्झिट पोलच्या आकड्यांपेक्षा कमी पडल्यास, निफ्टी स्पेससह एकूण बाजारात विक्रीचा सौम्य दबाव येऊ शकतो, तथापि, जर निकाल अपेक्षेपेक्षा चांगले असतील तर-म्हणजे जर एनडीएने सरासरी एक्झिट पोलच्या संख्येपेक्षा जास्त जागा मिळवल्या तर- मग निफ्टीने उत्साही हालचालीची दुसरी फेरी स्विकारली.'
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'सत्ताधारी पक्ष सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकणार असल्याचे एक्झिट पोलने सूचित केल्याने आज देशांतर्गत बाजारात तेजी आली. जे राज कीय स्थिरता आणि समर्थनामुळे परकीय प्रवाहाची संभाव्य वाढ दर्शवते. मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक डेटामुळे बाजारालाही चालना मिळाली. FY23 मध्ये ७.२% च्या तुलनेत FY24 मध्ये भारताचा GDP ८.२% इतका वाढला.
अहवालानुसार, केंद्राने रोड टोल शुल्क ३% आणि ५% दरम्यान वाढवण्याची अपेक्षा आहे या बातमीमुळे IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स १०.१४ % ने वाढले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत 40% पेक्षा जास्त वाढले आहेत, ज्यामुळे ती ८ लाख कोटी रुपयांची मार्केट कॅप तोडणारी सातवी भारतीय कंपनी बनली आहे. देशांतर्गत बाजारातील सकारात्मक ट्रेंडच्या अनुषंगाने, अदानी समूहाचे समभाग आजही लक्ष केंद्रीत होते कारण ते सलग दुसऱ्या सत्रात वाढले.'
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,' एक्झिट पोलने चालू सरकारसाठी एक संस्मरणीय विजयाचा आशावाद सक्रिय केला आहे, PSUs मध्ये एक प्रचंड रॅली होती,सु धारणेचा फायदा सुरू ठेवण्याच्या अपेक्षेने, पुढील री-रेटला चालना दिली. व्यापक रॅलीचा टिकाव इन-लाइन सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे. वास्तविक टॅलीच्या विशालतेसह, गेल्या ३ महिन्यांत ओतलेल्या प्रवाहामुळे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८.२% ची जीडीपी वाढ, १०० दिवसांच्या उपायांची यादी आणि अंतिम बजेट हे प्रमुख मुद्दे असतील. येत्या आठवड्यात निरीक्षण करा.
रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'रुपयाने ०.३० रुपयांनी उच्च व्यवहार केला, ८३.१५ वर बंद झाला, आणि सुरुवातीच्या सत्रात ८२.९८ च्या उच्चांकावर पोहोचला. सध्याच्या सरकारच्या चांगल्या फरकाने विजयाच्या अपेक्षेने रुपयाच्या खरेदीदारांना आकर्षित केले, सकारात्मक निधी प्रवाहाच्या अपेक्षेने. डॉलरमुळे ट्रेंड अस्थिर आहे. उतार-चढ़ाव, परंतु निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलशी जुळले तर रुपयाची ताकद कायम राहण्याची अपेक्षा आहे.'
सोन्याच्या दरावर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'सोन्याचा व्यवहार ७१७०० च्या खाली झाला, सकाळच्या सत्रात ७१३०० च्या नीचांकी पातळीला स्पर्श केल्यामुळे कॉमेक्स गोल्डने $२३४० च्या खाली विक्रीचा दबाव दिसला. शुक्रवारच्या उशिरा सत्रात सोन्यामध्ये नफा बुकींग दिसली, कारण व्याजदर कपात सध्या दूरची वाटत आहे. एकदाची निश्चितता सप्टेंबरच्या दरात कपात झाली, सोन्याच्या किमतींवर सकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित आहे, विशे षत: बुधवार आणि शुक्रवारी ADP नॉनफार्म एम्प्लॉयमेंट डेटा आणि नॉनफार्म पेरोल हे बाजारातील सहभागींसाठी लक्ष केंद्रित करेल.'
बँक निफ्टीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, 'आज, बँक निफ्टीने सर्व प्रतिकार पातळी तोडून टाकल्या, जे एक्झिट पोलच्या निकालांमुळे मजबूत उत्साही भावना दर्शवतात. तथापि, खरेदी-ऑन-डिप चा अवलंब करण्याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी पुढील २-३ सत्रांसाठी बाजाराचे निरीक्षण करणे उचित आहे.'