मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा निर्णय दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने अरुण गवळीचा जोरदार फटका बसला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी पार पडली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्यातरी अरुण गवळीची सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.