नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघटनेत जम्मू – काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा चांगलेच सुनावले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. ज्याला प्रत्युत्तर देताना भारताने जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानच्या निराधार टिप्पणीवर टीका केली. त्यांनी या टिप्पण्या राजकीय हेतूने प्रेरित आणि निराधार असल्याचे सांगितले. आपल्याच देशात लहान मुलांवर होत असलेल्या गंभीर उल्लंघनापासून लक्ष विचलित करण्याचा हा आणखी एक नेहमीचा प्रयत्न असल्याचाही टोला भारताने लगावला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मुले आणि सशस्त्र संघर्षावरील खुल्या चर्चेदरम्यान, संयुक्त राष्ट्रातील भारताचे उपप्रतिनिधी आर रवींद्र यांनी बुधवारी सांगितले की जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानचे विधान हे राजकीय हेतूने प्रेरित आणि भारताविरोधातील धोरणामुळे आले आहे, असाही टोला भारताने लगावला आहे.