ओवैसींची जीभ छाटून भर चौकात उभं करा!

नितेश राणेंचा घणाघात

    26-Jun-2024
Total Views |
 
Asaduddin Owaisi
 
मुंबई : असदुद्दीन ओवैसींची जीभ छाटून त्याला भर चौकात उभं करायला हवं, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेताना संसदेत जय पॅलेस्टाईन असा नारा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.
 
नितेश राणे म्हणाले की, "पाकिस्तानच्या संसदेत कुणी वंदे मातरम किंवा जय श्री राम चा नारा दिला असता तर तो व्यक्ती संसदेच्या बाहेर जिंवतही येऊ शकला नसता. पण जिथे आम्ही लोकशाहीची पूजा करतो त्या संसदेत उभं राहून जर कुणी विरोधी राष्ट्रांचा आणि अतिरेक्यांचा जयजयकार करत असेल तर तो दोन पायांवर कसा बाहेर येतो? याबद्दल भारतीय नागरिकांनी विचार करायला हवं. हा प्रकार पाकिस्तान किंवा चीनमध्ये झाला असता तर तिकडच्या संसदेने त्याला जिवंतही ठेवलं नसतं."
 
हे वाचलंत का? -  महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वात मोठे पळपुटे!
 
ते पुढे म्हणाले की, "ओवैसीमध्ये खरंच हिंमत असेल तर त्यांनी भर चौकात यावं. भारतीयांची आणि हिंदु राष्ट्राची ताकद काय आहे हे दाखवून देऊ. अशा ओवैसींची जीभ छाटून त्याला भर चौकात उभं करायला हवं. जो कुणी हे करणार असेल तर त्याने माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जावं," असेही ते म्हणाले.