शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत नुकसान भरपाई मिळणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

    26-Jun-2024
Total Views |
 
Shinde
 
मुंबई : शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील खरीपाचा आढावा घेतला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जूनपर्यंत पूर्ण करावे. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी," असे निर्देश त्यांनी दिले. तसेच खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.
 
हे वाचलंत का? -  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित!
 
या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.