मुंबई : संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वात मोठे पळपुटे आहे, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेला आता शेलारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
आशिष शेलार म्हणाले की, "संजय राऊतांनी लोकसभेत समर्थन दिलेल्या ३७० मध्ये राज्यसभेत जाऊन पळ काढला. केवळ हिरव्या रंगासाठी राऊत आणि त्यांच्या पक्षाने ३५ ए ला समर्थन देऊन काश्मीरचा विशेष दर्जा गायब केला आणि पळ काढला. राम मंदिर आणि राम वर्गणीमधून त्यांनी पळ काढला. त्यामुळे संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वात मोठे पळपुटे आहेत. त्यांनी दुसऱ्याला धडा शिकवू नये," असे ते म्हणाले.
बुधवारी विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, , मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांसाठी मतदान सुरु आहे. दरम्यान, आशिष शेलार यांनीदेखील आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.