नवी दिल्ली : १८व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात जय पॅलेस्टाईन म्हणत नवा वाद निर्माण केला आहे. शपथ झाल्यानंतर ओवेसींनी अशाप्रकारचा नारा दिला. तर ओवेसींनी आपल्या शपथविधीची सुरुवात बिस्मिल्लाचा पठण करून घेतली.
खासदार म्हणून शपथ घेताना जय भीम, जय मीम, जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईनच्या घोषणा देण्यात आल्या.
त्यामुळे भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारी (२४ जून) सुरू झाले, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या मंत्रिपरिषदेचे सदस्य तसेच इतर नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. कार्यवाहक सभापती (प्रोटेम स्पीकर) भर्त्रीहरी महताब यांनी सदस्यांना शपथ दिली. पण, ओवेसींनी दिलेल्या नाऱ्यांमुळे नवा वाद उफाळून आला आहे.