शेअर बाजार विश्लेषण: बाजारात युटर्न! सेन्सेक्स व निफ्टीत अखेरीस किंचीत वाढ सेन्सेक्स १३१.१८ अंशाने वाढला

बँक निर्देशांकात वाढ तर मिडिया, मेटल समभागात घसरण

    24-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
मोहित सोमण: आज अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात थोडी वाढ झाली आहे. सकाळी जागतिक संमिश्र पडसाद उमटले असताना शेअर बाजारात संमिश्र कौल मिळाला होता. सुरूवातीच्या नकारात्मक कौलनंतर मात्र अखेरीस बाजारात उलटे वारे फिरल्याने बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १३१.१८ अंशाने वाढत ७७३४१.०८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ३६.७५ अंशाने वाढत २३५३७.८५ पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांक १३.४२ अंशाने वाढ होत ५८७१०.०२ पातळीवर बाजार पोहोचला आहे. तर निफ्टी बँक निर्देशांक ४२.५० अंशाने वाढत ५१७०३.९५ पातळीवर पोहोचला आहे. याशिवाय बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३७ व ०.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅपमध्ये ०.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.१० टक्क्यांवर घसरण झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळप्रमाणेच संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. बाजारात सकाळपासून समभाग विशेष प्रति साद कायम राहिल्याने निर्देशांक सकारात्मक राहिला असला तरी समभाग पातळीवर विविधता कायम राहिली आहे. सर्वाधिक वाढ ऑटो (०.८७), कनज्यूमर ड्युरेबल्स (०.७५%), फायनांशियल सर्विसेस (०.५३%) एफएमसीजी (०.७२%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण मिडिया (१.८७%), मेटल (०.६४%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.९५%), तेल गॅस (०.४४%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ४१५५ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २१०७ समभाग वधारले असून १८९० समभाग घसरले आहेत. ३०१ समभागांच्या ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ झाली आहे तर ३१ समभागांच्या मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. ५ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत ३ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. आज बीएसईतील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ( Market Capitalisation) ४३५.६० लाख कोटी रुपये होते.
 
आज एनएसईत एकूण २७९२ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १४२० समभाग वधारले असून १२७६ समभागात घसरण झाली आहे. १९२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १६ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण १५५ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ६९ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. एनएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल आज ४३१.७८ लाख कोटी रुपये होते.
 
आज सकाळच्या सत्रात आशियाई बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. प्रामुख्याने युएस पीएमआय (Purchasing Manager Index) मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने व युएस बाजारातील संमिश्र आर्थिक आकडेवारीमुळे बाजारात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला होता. युएस फेडरल व्याजदरात कपात होण्याची शक्यता तात्पुरती गुंडाळून ठेवल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली होती. आता आगामी आठवड्यातील युएस फेडरल रिझर्व्ह बँक काय जाहीर देते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असली तरी अमेरिकन बाजारातील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.१६ टक्क्यांनी वाढ झाली होती तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.११ टक्क्यांनी वाढत सोने ७१६६०.०० पातळीवर पोहोचले आहे.भारतातील २२ व २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात १०० ते १५० रुपयांनी घसरण झाली आहे. काही सराफा बाजारात सोन्याची किंमत १००० ते १५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या निर्देशांकात पुन्हा वाढ झाली आहे. डॉलरच्या किंमतीतील वाढ, सकारात्मक पीएमआय आकडेवारी व मध्यपूर्वेतील वाढलेला दबाव यामुळे क्रूड (कच्च्या) तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे तसेच कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातही तुटवडा झाल्याने बाजारातील तेलाच्या किंमतीत वाढ झाली.संध्याकाळपर्यंत WTI Future क्रूड निर्देशांकात ०.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात ०.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात ०.३६ टक्क्यांनी वाढत तेलाची पातळी ६७७०.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचली आहे.
 
भारतातील आज शेअर बाजारात ' इक्विलिब्रियम ' परिस्थिती दिसली आहे. बाजारातील वाढ व घसरणीत फारसा फरक न होता बाजार सपाट पातळीवर पोहोचले होते. अंतिमतः बाजारात किरकोळ वाढ झाली होती. सुरूवातीच्या कलात बाजारात घसरण होत होती मात्र बाजारातील संमिश्र प्रतिसादाने बँक निर्देशांकातही वातावरण जैसे थे राहिले होते. निर्देशांकापुरती समभागात अखेरीस वाढ दिसली होती. सेन्सेक्स व निफ्टीनेही कुठलाही नवा फ्रेश ट्रिगर नसल्याने आज आपली संख्या मर्यादित पातळीवर ठेवली होती.
 
समभागात आज मिडियात मोठी घसरण झाली आहे तर एफएमसीजी, रिअल्टी, कनज्यूमर ड्युरेबल्स समभागात वाढ झाली होती. आज समभागांच्या वाढण्याची सुरुवात अखेरच्या सत्रात झाली असली तरी कुठल्याही प्रकारचा समभागात १ टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकली नाही. आशियाई बाजारातील दबाव कायम असताना गुंतवणूकदारांचे लक्ष संसदेतील अधिवेशनाकडे लागले होते. याशिवाय अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता घटल्याने बाजारात परकीय गुंतवणूकांचा प्रतिसाद राहिला असला तरी बाजारातील भिस्त ही देशांतर्गत गुंतवणूकदारांवर कायम राहिली आहे. मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये राहिलेल्या चांगल्या प्रदर्शनामुळे बाजारातील घसरण मर्यादित राहिली आहे.सकाळच्या सत्रात झालेली घसरण हेवीवेट समभागात झालेल्या वाढीमुळे मर्यादित राहिली होती. महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, आयटीसी या समभागात वाढ झाल्याने निर्देशांक तरण्यास मदत झाली आहे.
 
अखेरच्या सत्रात बीएसईत एम अँड एम,पॉवर ग्रीड, सनफार्मा, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक,आयटीसी, एनटीपीसी, टाटा कंपनी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, लार्सन, टीसीएस, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, एचयुएल या समभागात वाढ झाली आहे. तर इंडसइंड बँक, टाटा स्टील, रिलायन्स, एक्सिस बँक, बजाज फायनान्स, एचसीएलटेक, एसबीआय, इन्फोसिस,टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा, विप्रो या समभागात घसरण झाली आहे.
 
आज एनएसईत एम अँड एम,पॉवर ग्रीड, श्रीराम फायनान्स, ग्रासीम, सनफार्मा, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, बजाज ऑटो, अपोलो हॉस्पिटल, हिरो मोटोकॉर्प, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक,आयटीसी, डॉ रेड्डीज, बजाज फिनसर्व्ह, आयशर मोटर्स, एचडीएफसी बँक, टायटन कंपनी, भारती एअरटेल, एशियन पेंटस, अदानी एंटरप्राईज, टीसीएस, टेक महिंद्रा, हिंदाल्को, ओएनजीसी, एचयुएल या समभागात वाढ झाली आहे. सिप्ला, इंडसइंड बँक, अदानी पोर्टस, कोल इंडिया, टाटा स्टील, रिलायन्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, बीपीसीएल, एक्सिस बँक, बजाज फायनान्स, ब्रिटानिया, एचसीएलटेक, एसबीआय,टाटा मोटर्स, जेएसडब्लू स्टील, कोटक महिंद्रा, लार्सन या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट ऋषिकेश येडवे म्हणाले, ' जागतिक संकेतांच्या प्रभावाने सोमवारी निफ्टी खाली घसरला. सुरुवातीच्या गुडघेदुखीच्या प्रतिक्रियेनंतर, निर्देशांक सुधारला आणि एका अरुंद श्रेणीत व्यापार केला. शेवटी, निफ्टी २३५३८ वर सकारात्मक नोटवर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, गेल्या दोन आठवड्यांपासून, निर्देशांक २३३३०-२३६७० च्या बँडमध्ये एकत्रित होत आहे. अशा प्रकारे, नवीन तेजीसाठी, निर्देशांक २३६७०-२३७०० झोनच्या वर टिकून राहणे आवश्यक आहे. २३७०० च्या वर टिकून राहिल्यास, रॅली २४००० पातळीपर्यंत वाढू शकते. नकारात्मक बाजूने, २३३०० निर्देशांकासाठी मजबूत समर्थन म्हणून काम करेल.'
 
 
बँक निफ्टी कमजोर नोटेवर उघडला. तथापि, सुरुवातीच्या अस्वस्थतेनंतर, निर्देशांकाने वेग घेतला आणि शेवटी ५१७०४ वर सकारात्मक नोटवर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने अलीकडील ब्रेकआउट पॉइंट आणि साक्षीदार पुनर्प्राप्तीची पुन्हा चाचणी केली आहे, जी ताकद दर्शवते. अशा प्रकारे, जोपर्यंत निर्देशांक ५१००० पातळीच्या वर आहे तोपर्यंत खरेदी-ऑन-डिप्स धोरण अवलंबले पाहिजे. वरच्या बाजूला, ५२००० बँक निफ्टीसाठी तात्काळ अडथळा म्हणून काम करतील, जेथे ट्रेंड लाइन रेझिस्टन्स ठेवला जातो.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,
'बाजार एकत्रीकरणाच्या मार्गावर असूनही, अर्थसंकल्पीय अपेक्षांच्या अपेक्षेने FMCG आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये क्षेत्रीय मंथन दिसून येते. RBI कडून चांगले कर संकलन आणि लाभांश ग्रामीण खर्च आणि कर लाभांवर भारत सरकारला प्रोत्साहन देईल. मध्यम आणि लहान कॅप्समध्ये , जरी मूल्यांकनाच्या दृष्टीने सुरक्षिततेचे मार्जिन कमी असले तरी, गुंतवणूकदार भांडवली वस्तू, इन्फ्रा, ऑटो इ. मधील वाढीच्या कथेबद्दल उत्सुक आहेत.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले की, ' बाजाराने आठवड्याची सुरुवात किंचित घसरणीसह केली परंतु स्थिरीकरणाचा टप्पा सुरू ठेवत तो सपाट बंद करण्यात यशस्वी झाला. सुरुवातीच्या घसरणीनंतर, निफ्टीने सत्राच्या पहिल्या सहामाहीत हळूहळू चढ-उतार केला, त्यानंतर बंद होईपर्यंत श्रेणीबद्ध हालचालीने, ०.१६ % वाढून, २३५३७.८५ वर समाप्त झाला. ऑटो आणि एफएमसीजी क्षेत्रांनी चांगली कामगिरी केल्याने क्षेत्राची कामगिरी मिश्रित होती, तर धातू आणि आयटी क्षेत्रे दबली. अशाच प्रकारचा कल व्यापक बाजारपेठांमध्ये दिसून आला, जेथे मिडकॅप हिरव्या रंगात बंद झाले आणि स्मॉलकॅप्स जवळजवळ अपरिवर्तित झाले.निर्देशांकातील हे एकत्रीकरण आतापर्यंत निरोगी दिसत आहे आणि आम्ही आशा करतो की ते लवकरच पूर्ण होईल.दरम्यान, निफ्टी २३१०० च्या खाली येईपर्यंत व्यापाऱ्यांनी स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित करून "बाय ऑन डिप्स" धोरण राखले पाहिजे.'
 
सोन्याच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, ' कॉमेक्स गोल्डला $२३२० आणि MCX गोल्डला ७१५०० च्या जवळपास समर्थन मिळाल्याने सोन्याच्या किमतीत सकारात्मक हालचाल दिसून आली. कोर PCE इंडेक्स डेटा या शुक्रवारी रिलीझसाठी शेड्यूल करण्यात आला आहे, कमी संख्येच्या अपेक्षा सोन्यामध्ये तेजीच्या भावनांना समर्थन देऊ शकतात. कोणतीही महत्त्वाची पोझिशन तयार करण्यापूर्वी अस्वल स्पष्ट सिग्नलची वाट पाहण्याची शक्यता आहे. आर्थिक डेटाच्या या अपेक्षेने बाजार सावध आणि संभाव्य अस्थिर ठेवण्याची अपेक्षा आहे.'