मुंबई: संदीप टंडन यांच्या मालकीचे क्वांट म्युच्युअल फंड (Quant Mutual Fund) विरूद्ध सेबीने कारवाई केली आहे. सेबी अँक्शन मोडवर येत क्वांट म्युच्युअल फंडाच्या कार्यालयावर छापे टाकले असून कंपनीची कसून चौकशी सुरू केली आहे. कंपनीचे मालक संदीप टंडन यांचीही चौकशी सुरु करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. फ्रंट रनिंग (Front Running) मार्फत बेकायदेशीरपणे २० कोटींचा नफा कमावल्याचे आरोप टंडन यांच्यावर करण्यात आले आहेत.
या आरोपांची चौकशी होताना सेबीला पूर्णपणे सहकार्य करू असे आश्वासन टंडन यांनी दिले आहे. गुंतवणूकदारांनी कायद्याच्या चौकटीत राहून नफा कमावून देण्यासाठी व सेबीच्या नियमावलीचे पालन करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे टंडन यांनी सांगितले आहे. मात्र सेबीने टंडन यांच्यावर ठपका ठेवत चौकशी सुरू केली आहे. ज्यामध्ये सेबीने (SEBI) ने या गैरप्रकाराशी संबंधित असलेल्या डीलर, ब्रोकर व इतर व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.
Quant कंपनी ही म्युच्युअल फंड गुंतवणूक उद्योगातील मोठी कंपनी समजली जाते. सध्या कंपनीच्या व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (Asset Under Management AUM) ९०००० कोटींहून अधिक आहे. क्वांट म्युच्युअल फंडाच्या मुख्य कार्यालय मुंबई व हैद्राबाद येथील कार्यालयात सेबीने छापा टाकला आहे.
फ्रंट रनिंग म्हणजे काय?
फ्रंट रनिंग हा इनसायडर ट्रेडिंग प्रमाणेच एक बाजारातील गैरप्रकार समजला जातो. बाजारातील आपल्या ओळखीचा गैरवापर करत बाजारातील महत्वाची माहिती कळल्यानंतर त्याचा ट्रेडिंगसाठी गैरप्रकार नफा कमावण्यासाठी करणे होय. हे ब्रोकरद्वारे स्टॉक किंवा आर्थिक साधनामध्ये व्यापार करत आहे ज्याच्याकडे भविष्यातील व्यवहाराची आतील माहिती आहे ज्यामुळे त्याच्या किंमतीवर परिणाम होईल. ब्रोकर सार्वजनिक नसलेल्या माहितीच्या आधारावर कार्य करतो, एखादी फर्म खरेदी किंवा विक्री करणार आहे किंवा शिफारशी जारी करणार आहे, ज्यामुळे बाजारातील सिक्युरिटीजच्या किंमतीवर परिणाम होईल. कायद्याने हा ' Insider Trading ' सारखाच गुन्हा आहे.
भारतामध्ये फ्रंट रनिंग बेकायदेशीर आहे. समोर चालणारे आणि फसवे व्यवहार रोखण्यासाठी SEBI ने अलीकडेच म्युच्युअल फंड नियमांमध्ये सुधारणांना मंजुरी दिली आहे. एप्रिलमध्ये, SEBI ने कथित फ्रंट-रनिंग ऍक्टिव्हिटीजवर आठ संस्थांना प्रतिबंधित केले.