धक्कादायक! पुण्यात हॉटेलच्या स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलांची ड्रग्ज पार्टी
24-Jun-2024
Total Views | 42
पुणे : पुण्यातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले ड्रग्ज सेवन करताना आढळले असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील फर्ग्युसन रोडवरच्या एल-३ पबमधील तीन मुलं स्वच्छतागृहात ड्रग्जचं सेवन करतानाचा व्हिडीओ पुढे आला आहे. या व्हिडीओमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांचे निलंबन केले आहे.
याशिवाय हॉटेल मालकासह मॅनेजर आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे हॉटेलही सील करण्यात आले आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आणि पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातून ड्रग्ज सेवनाचा प्रकार पुढे आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.